पाटण येथे आ.देसाईं यांच्याकडून भूकंपग्रस्तांना भावपूर्ण श्रध्दाजंली

दौलतनगर: पाटण तालुक्यात 1967 साली दि.11 डिसेंबरला झालेल्या महाप्रलयकारी भूकंपाला आज 52 वर्षाचा कालावधी लोटला असून या महाप्रलयकारी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना आज पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करीत दौलतनगर येथील कारखाना कार्यस्थळ व रासाठी याठिकाणी विनम्र अभिवादन केले.
भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, दि.11 डिसेंबर, 1967 ला पाटण तालुक्यात कोयनानगरला झालेल्या महाप्रलयकारी भूकंपामध्ये येथील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.आज या दुर्दैवी घटनेला 52 वर्षांचा कालावधी लोटला असून या भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या भूकंपग्रस्तांना मी पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन करतो.महाप्रलयकारी भूकंपात नूकसान झालेली तसेच विस्कटलेली घडी पुर्ववत बसविण्याकरीता आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब हे राज्याचे मंत्री असताना दोन महिने पाटण तालुक्यात तळ ठोकून होते.
कोयनेची विस्कटलेली घडी पुर्ववत होईपर्यंत त्यांनी पाटण तालुका सोडला नव्हता.या भूकंपात नुकसान झालेल्या भूकंपग्रस्तांना त्यांनी राज्याचे मंत्री म्हणून खुप मोठी मदत केली होती ती मदत आजही पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या स्मरणात आहे.
लोकनेते बाळासाहेब यांनीच पाटण तालुक्यातील या बाधित भूकंपग्रस्तांसाठी भूकंपाचे दाखले सुरु केले. त्यांच्या पश्चात 1995 ला हे भूकंपाचे दाखले देणे शासनाने बंद केल्यानंतर या दाखल्यासाठी मी स्वत: राज्य शासनाकडे पाठपुरावा केला व वेळप्रसंगी कायदयाचा आधार घेवून 1995 ला बंद झालेले भूकंपाचे दाखले सुरु करुन घेण्यात मला यश मिळाले. तालुक्याचा आमदार या नात्याने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांच्या कामांनाही कधीही मिळाला नाही एवढा निधी गत पाच वर्षात युतीच्या राज्य शासनाकडून मंजुर करुन आणण्यात मला यश आले. कोयनेचे वैभव पुन्हा मिळवून देणेकरीता आमदार म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर करुन आणत आहे.
कोयना पर्यटनाच्या दृष्टीने तसेच कोयनानगरच्या आसपासचा 10 किमीचा परिसर पर्यटनाच्या माध्यमातून विकसीत करणेकरीता मी मागील पाच वर्षात 7.50 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. कोयना पुनर्वसन गावठाणांतील मुलभूत सुविधांची तसेच कोयना पर्यटनाची कामे मोठया प्रमाणात कोयना विभागात सुरु आहेत.
कोयनेला गतवैभव मिळणेकरीता माझे कसोशीने प्रयत्न सुरु असून कोयना प्रकल्पग्रस्तांची काही उर्वरीत कामे राहिली आहेत ती कामे आताच्या महाविकासआघाडीचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या माध्यमातून सोडविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. असे सांगून त्यांनी आमदार या नात्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने पुनश्च: एकदा दि.11 डिसेंबरच्या महाप्रलयकारी भूकंपात मृत्यू पावलेल्या भूकंपग्रस्तांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन करतो असे ते म्हणाले यावेळी कारखाना कार्यस्थळावर आमदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखालील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखाना अधिकारी तसेच रासाठी याठिकाणी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.