माणुसकी धर्म जागविणारे खऱ्या कोरोना योध्दांचा समाजातून सन्मान होणे अपेक्षित..

 

पाटण:- कोरोनाच्या महामारीत माणूसच माणसाचा राहिला नसताना माणुसकी धर्म जागविणारे अनेक हात समोर येताना दिसत आहेत. यालाच आपण कोरोना योध्दा म्हणून संबोधित आहोत. पाटण तालुक्यात देखील शेकडो हात स्वत:चा जिव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांच्या मदतीला कोणत्याही सन्मानाच्या अपेक्षेशिवाय रात्रंदिवस झगडत आहेत. यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई, ग्रामपंचायत, नगरपंचायत सफाईकामगार, अरोग्य सेविका, सेवक, डॉक्टर्स, अधिकारी कर्मचारी, पोलिस यांचा कर्तव्य दक्ष हरहुन्नरीने सहभाग आहे. या माणुसकी धर्म जागविणाऱ्या खऱ्या कोरोना योध्दांचा समाजातून सन्मान होणे आवश्यक आहे..
असाच एककर्तव्य दक्ष हरहुन्नरी पाटण नगरपंचायतीचा सफाई कर्मचारी बबन पाटील यांच्यासह नगरपंचायतीच्या सफाई कामगार व इतर कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कोरोना काळातील तत्परयता खऱ्या अर्थाने समाजातील आरोग्य देवदूत रुपाने पुढे येत आहे. यांच्या कार्याला पाटण शहरातील नागरिकांनी कोरोना योध्दा म्हणून सलाम दिला आहे..
कोरोना महामारीचे महाभयंकर संकट सगळीकडे जोमात हातपाय पसरु लागले आहे. या महामारीने शहरा बरोबर ग्रामीण भागाला देखील विळखा द्यायला सुरवात केली आहे. सातारा जिल्यात दररोज शंभरीच्या आसपास नवीन रुग्ण सापडू लागले आहेत. यातील नाही म्हणले तरी दहा – वीस रुग्ण पाटण तालुक्यातील मिळत आहेत. या रुगणांच्या संपर्कातील कोरोना संशयित व्यक्तींना तळमावले व पाटण येथील कोरोना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. सद्या पाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह (नवीन), बाळासाहेब देसाई कौलैज येथील प्रियदर्शनी मुलींचे वसतिगृह, आजी – माजी सैनिक मुलांचे वसतिगृह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह चापोली रोड (जुने) या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. अशा ठिकाणातील दररोजची साफसफाई, स्वछता पाटण नगरपंचायतीचे सफाई कामगार कर्तव्य दक्ष भूमिकेतून पार पाडत आहेत. या सफाईतून दररोज गोळा झालेला कचरा नगरपंचायतीच्या घंटा गाडीतून विल्हेवाटसाठी गावाबाहेर नेऊन योग्य दक्षता घेऊन याची विल्हेवाट लावली जात आहे. हे सर्व करत आसताना सफाई कामगार यांच्यासह बबन पाटील यांना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मानुसकीच्या भावनेतून सामाजिक कर्तव्य बजावल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
बबन पाटील हे पोटासाठी मिळल ते काम करण्याची तयारी दाखविणारे व्यक्ती महत्त्व आहे. पाटण शहरातील एका खाजगी दवाखान्यात सफाई कामगार म्हणून काम करणारे बबन गेल्या चार – पाच वर्षापूर्वी ग्रामीण रुग्णालयात पाटण येथे कौंट्रेकबेसवर तुटपुंज्या पगारावर कामाला लागले. पाटण ग्रामीण रुग्णालयाची अवस्था तर सातारा जिल्ह्यात सर्वज्ञात आहे. अशा ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करत आसताना ते मयत रुग्णांच्या पोस्टमार्टेमचेही काम करु लागले. डेड बौडी फाडणे, शिवणे, बांधणे अशी कामे त्यांना वेळेनुसार करावी लागत. पाटण तालुका ग्रामीण डोंगर – दुर्गम भागात मोडत असल्याने मयत बौडी नातलगांना घरी न्यायला देखील अनेक आडचणींना सामोरे जावे लागत. नातलगांची होणारी आडचण लक्षात घेऊन त्यांनी छोटी ओमनी जुनी गाडी कर्जावर विकत घेऊन मयत बौडी नातलगांच्या घरपोच करण्याची सेवा सुरू केली. सद्या कोरोना महामारीत पाटण नगरपंचायतीकडे सफाई कामगार म्हणून काम करत असताना शहरातील चार विलगीकरण कक्षातील दररोजचा कचरा घंटागाडीत भरणे, तो शहराबाहेर नेऊन त्याची पूर्ण विल्हेवाट लावणे, विलगीकरण कक्षात सैनिटायझर औषधांची फवारणी करणे तसेच कोरोना व्यक्तीचा म्रुत्यु झाल्यास त्याच्यावर कोरोना निकषातंर्गत अंत्यसंस्कार करणे आदी कामे त्यांना करावी लागतात. अंत्यसंस्कार च्या कामात त्यांना नगरपंचायती मधील कर्मचारी विष्णु चव्हाण, चंद्रकांत मोरे, सुनील चौधरी, सुर्यकांत चव्हाण, चिंगू पाटणकर, रघुनाथ नायकवडी, बाळासाहेब राजेशिर्के, प्रकाश भोसले, सुनिल लोखंडे, किरण काळे या कोरोना योध्दांचे सहकार्य लाभते. आज खऱ्याअर्थाने समाजाचे आरोग्य देवदूत प्रत्यक्षदर्शी काम करणारे हे कोरोना योध्दा आहेत. आज यांचा समाजातून सन्मान होणे हेच खरे यांचा कामाचा गौरव आहे.

चौकट:- कोरोना योध्दा म्हणून समाजाशी काडीमात्र संबध नसणाऱ्या आणि केवळ सोशल मीडियावर अपडेट राहणाऱ्या स्वयंघोषित समाजसेवकांना काही खाजगी संस्थाकडून “कोरोना योध्दा” सन्मानपत्र वाटण्याचा सुळसुळाट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. स्वत:ची खोटी स्तुती करुन घेण्यात हे स्वयंघोषित कोरोना योध्दे सद्या आघाडीवर दिसत आहेत. कोरोना काळात कधीही समाजात न दिसलेल्या चेहऱ्याला डायरेक्ट कोरोना योध्दा “सन्मानपत्र” सोशल मीडियावर झळकू लागली आहेत. अशा सन्मापत्राने आज कोरोना साठी लढणाऱ्या खऱ्या कोरोना योध्दांचे खचीकरण करण्यात या खाजगी संस्था धन्यता मानत असतील तर अशा संस्थावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजातूनच होत आहे.