कोरोना रुग्ण वाढत असताना पाटण ग्रामीण रुग्णालयातून स्टाफच्या बदल्या न थांबवल्यास आंदोलनाचा इशारा. रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी


पाटण :- पाटण तालुक्यातील सर्व सामान्यांचे रुग्णालय म्हणून पाटण ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जाते. सद्या सगळीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता इतर आजारांच्या रुग्णांची देखील संख्या वाढत आहे. अशा परस्थितीत पाटण ग्रामीण रुग्णालयात आदीच कर्मचारी स्टाफ ची कमतरता आहे. अशा वेळी येथील कर्मचाऱ्यांची काम करताना दमछाक होत आहे. तरीदेखील येथील रुग्णालयातील कामाचा व कर्मचाऱ्यांवर कामाचा पडणारा तान – तनाव न पहाता येथीलच कर्मचारी स्टाफची इतरत्र बदली करण्याचे उध्दोग वरीष्ठ पातळीवरुन होत असल्याने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईक यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील कर्मचारी स्टाफ च्या बदल्या न थांबविल्यास व रिक्त असलेल्या जागा त्वरित न भरल्यास मराठा- बहुजन क्रांती मोर्चा सामाजिक ऐक्य समिती कडून आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे..
या निवेदनात पुढे म्हणले आहे पाटण येथे महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण रुग्णालय असून येथे सातारा जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालयापेक्षा सर्वात जास्त ओपीडी, प्रसूती व इतर आजारावर उपचार केले जातात. दिवसाला साधारणपणे २५० ते ३०० ओपीडी तसेच महिन्याला साधारण ५० ते ५५ प्रसूती, १० – १२ सिजेरियन प्रसूती व इतर उपचार केले जातात. या रुग्णालयातून शेकडो गोरगरीब जनतेला मोफत औषध उपचार केले जातात. शासनाचे आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जातात. परंतु नेहमीच या रुग्णालयात स्टाफ ची कमतरता असते.
सद्या पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण रुग्णालयावर त्याचा जास्त ताण पडत आहे. या ठिकाणी संशयित कोरोना स्वैब हि घेतले जात आहेत. पुढील काळात येथे रैपीड टेस्ट पण घेतल्या जाणार आहेत. यासाठी पाटण ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक जादा असणे आवश्यक आहे. त्यासाठी पाटण जवळच्या इतर रुग्णालयातील प्रयोगशाळा सहाय्यक यांची तात्पुरती नेमणूक होणे गरजेचे असून रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ व ईतर कर्मचारी यांची इतरत्र कोठेही बदली करण्यात येवू नये. तसेच रुग्णालयात रिक्त असलेल्या जागा त्वरित भराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मराठा-बहुजन क्रांती मोर्चा सामाजिक एक्य समितीचे समन्वयक यांच्या वतीने पाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत यादव यांना निवेदन देताना राजाभाऊ काळे, यशवंतराव जगताप, लक्ष्मण चव्हाण, दिपक भोळे, विक्रांत कांबळे, शंकर मोहिते, सुरेश संकपाळ, राहुल पवार, संतोष कवडे, नितीन पवार यांची उपस्थिती होती.