शिवछत्रपतींच्या कार्यासाठी मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी: यसुफ हकिम

पाटण : छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्मघेण हिच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रात पाटण सारख्या दुर्गम भागात जन्माला आलो. शिक्षणमहर्षि डॉ.बापूजी साळुंखे आणी पोलादी पुरूष, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायांचा कर्तुत्वाचा इतिहास महाराष्ट्राच्या कान्या कोपर्‍यात पोहचण्यासाठी धडपड सुरू झाली. या धडपडीची योग्य दखल घेऊन ऐकता संस्थेने दिलेला महाराष्ट्र राज्य पुरस्कार माझ्या सारख्या शिवमावळ्याला प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार दातेगड दुर्गसंवर्धन समिती आणी पाटण तालुक्यातील जनतेला समर्पित करतो. असे भावुक उदगार शिवव्याख्याते यसुफ हकिम यांनी पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी केले.
यावेळी आमदार रामराव वडकुटते, शंकरप्रसाद अग्निहोत्री, मराठी चित्रपट महामंडळाचचे अध्यक्ष मेघराज भोसले, सीने अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी, अभिनेता अरबाज खान, समाज सेविका दिव्या मराठे, प्रा. सत्येंद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवव्याख्याते यसुफ हकिम आपल्या भाषणात पुढे म्हणाले. शिवकार्यात खंभीर साथ भेटली ती दातेगड (सुंदरगड) संवर्धन समितीच्या सदस्यांची. दुर्ग संवर्धनासाठी प्राणपणाने झटणारे सगळे मावळे यांच्या कार्यात आपले योगदान म्हणून छत्रपती शिवव्याख्यानाचे संपूर्ण मिळणारे मानधन गडसंवर्धनाला आणी गरीब होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी द्यायचे ठरवले आहे. या पाठीमागे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणार्‍या गडकोटांना नवसंजीवनी मिळावी हिच अपेक्षा आहे. याची दखल एकता संस्थेने घेऊन महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन दुर्गसंवर्धन कार्याला पाठबळ दिले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानुन मिळालेला पुरस्कार हा दातेगड दुर्गसंवर्धन समिती आणी पाटण तालुक्यातील जनतेला समर्पित करतो. असे भावुक उदगार काढून यसुफ हकिम यांनी शेवटी सांगितले.
ऐकता संस्थेने दिलेल्या पुरस्कारासांठी शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, क्रीडा, वैद्यकीय, सहकार, उद्योग, कला, साहित्य, बचतगट आदि क्षेत्रातील विशेष कार्य करणार्‍या व्यक्तींची निवड केली. त्यामधे सातारा जिल्ह्यातून उत्कृष्ट वक्ते आणी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल शिवव्याख्याते युसुफ हकिम सर यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री .शंकरप्रसाद अग्नीहोत्री म्हणाले महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकीच्या भावनेने समाजासाठी झटणारे परंतु प्रसिध्दी पासून अलिप्त असणारे काही नररत्न आहेत त्यापैकीच आजचे सत्कारमूर्ती त्यांना प्रोत्साहन देने त्यांचे कौतुक करण्यासाठी चा पुरस्कार सोहळा इतरांना प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार रामराव वडकुटते म्हणाले पुरस्कार हा सामाजिक बांधिलकीचा भाग आहे. एखाद्याला पुरस्कार हा त्याच्या नावाने नाही त्याच्या कार्यामुळे, प्रामाणिकपणामुळे, त्यागामुळे दिला जातो. ज्यांचे कार्य समाज हिताचे त्याना पूरस्कार समाजच देतो त्यासाठी कोणाचा वशिला लागत नाही पुरस्कारप्राप्त सर्व व्यक्तींचे त्यांनी अभिनंदन केले.
मराठी चित्रपट महामंडळाचचे अध्यक्ष मेघराज भोसले म्हणाले चित्रपट सुर्ष्टीत पडद्यांवर असणारे कलाकार सर्वांना माहीत असतात. परंतु चित्रपट उत्कृष्ट करण्यात महत्वाची बजावनारे पडद्यामागे असणारे कलाकार पार पाडतात. त्याचप्रमाणे ही मंडळी प्रसिद्धिच्या मागे न पळता आपले कार्य करत राहतात असे ते म्हणाले . या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील आदी मान्यवर नागरिक उपस्थिति होते.