अनाथांना घास भरवून केंडे परिवाराने साजरा केला मुलाचा वाढदिवस ; केंडे परिवाराचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद.

 

पाटण:- पाटण तालुक्यातील अडुळ येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी केंडे (डिके )यांचा चिरंजीव कु. दिग्विजय ऊर्फ माऊली याचा वाढदिवस कोळे (ता.कराड) येथील जिजाऊ अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान करुन साधेपणाने साजरा केला. अन्नदान करत केंडे परिवाराने अनाथ मुलांना मायेचा घास भरवला तसेच या आश्रमाला देणगीही दिली, यावेळी धनाजी केंडे, सौ.रूपाली केंडे, नाडेचे सरपंच विष्णु पवार, सजेॅराव शिकेॅ (सर) अक्षय केंडे उपस्थित होते.

त्याचबरोबर वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ आणि धनाजी केंडे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या आरोग्य शिबीरात क्षयरोग शुगर, टी.बी.रक्ताची चाचणी, साथरोग सर्वेक्षण, किटकजन्य व जलजन्य आजाराविषयी माहिती देण्यात आली. या
शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकार डॉ. शिकलगार, आरोग्य सहाय्यक सातपुते, बी.डी.जाधव, एस. टीलोहार, ए. एस. शिंदे, सी. जे. कुलकर्णी. आशा स्वयंसेविका या आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी सरपंच जयवंत केंडे, माजी केंद्रप्रमुख शिवाजी शिर्के, ह.भ.प. लक्ष्मण शिर्के, भैरवनाथ दुध संस्थेचे चेअरमन सर्जेराव शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णत शिकेॅ, बंडू शिकेॅ, दादासो शिकेॅ, चद्रकांत शिकेॅ व अन्य मान्यवर उपस्थित होते. केंडे परिवाराने आपला मुलगा कु. दिग्विजय याच्या वाढदिवसानिमित्त सुभाषनगर येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप केले. धनाजी केंडे यानी राबवलेल्या उपक्रमांचे परिसरातून कौतुक होत आहे. सामाजिक उपक्रम राबवून धनाजी केंडे यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
लहानपणापासून समाज कार्याची आवड असलेल्या धनाजी केंडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत छोट्या मोठ्या अपघातामध्ये जखमी झालेल्या ४० ते ५० लोकांना आजवर जीवनदान दिले आहे. त्याचबरोबर सक्षम गृपच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत, वृक्षारोपन, गरजू लोकांना ब्लँकेट वाटप, असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे, या सामाजिक कार्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.