तरुणांना बेरोजगार करण्याचे पाप आ. देसाई यांनी केले :- सत्यजितसिंह पाटणकर ; सत्यजितसिंह पाटणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पाटण:- पाटण तालुक्याची वाटचाल सकारात्मक दिशेकडे सुरू आहे. परिवर्तनासाठी सर्वसामान्य माणूस व तरुण वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे. गेल्या पाच वर्षात विरोधकानी खोटी भूमिपूजने, खोटी विकासकामे दाखवून जनतेची घोर फसवणूक केलेली आहे. विरोधक म्हणतात १८०० कोटींची कामे आणली. मग विकास कुठे झाला? त्याचा पंचनामा आपणच करणार आहे. तालुक्यातील रोजगार निर्मितीची साधने या लोकांनी बंद केली. सर्व व्यवसाय बंद करण्याचे काम यांनी केले. हजारो तरूनांना बेरोजगार करण्याचे पाप आ. देसाई यांनी केले आहे. आत्ता हे कुठे तरी थांबले पाहिजे. आज मी निवडणूकिमध्ये उतरत असताना माझा एकचं अजंडा आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त रोजगार निर्मिती. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.

राष्ट्रवादी-राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे आघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण विधानसभा मतदार संघातुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, शिक्षण सभापती राजेश पवार, सभापती उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, जि. प. सदस्य बापुराव जाधव, सदाभाऊ जाधव, राजाभाऊ काळे, दिनकरराव घाडगे, पाटण दूधसंघाचे चेअरमन शंकरराव जाधव, सुभाषराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले. आपल्या शेजारच्या कारखान्याचा इतिहास जर पाहिला तर कारखाना जप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्याच शासनाने तसे नोटीस देखील कारखान्यावर काढली. या महाशयांनी स्वतःच्या कारकिर्दीत रोजगार निर्मिती केली नाहीच तर पाटण तालुक्यात असणारे रोजगार बंद करून हजारो तरुणांना बेरोजगार केले. वीटभट्टी सारखे व्यवसाय बंद करून हजारो कुटूंबांची उपासमार केली. ज्यांच्या मुळे पाटण तालुक्यातील जनता बेरोजगार होत असेल तर अशा आमदारांना वेळीच धडा शिकवा. स्वतःच्या ताब्यातील कारखाना बंद पडण्याचा अवस्थेत असताना यांना आमच्या कारखान्याची काळजी लागली आहे. आज आम्ही कारखान्याच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार देणार आहोत. चार महिन्यात कारखान्याची ट्रायल घेणार आहोत. आमच्या कारखान्याची काळजी आपण करू नका. असे सांगताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले अपयशी सरकार अन् निष्क्रिय आमदार अजून जर पुढील पाच वर्ष आपल्या डोक्यावरती बसले तर आपणा सर्वांचे भविष्य धोक्यात आहे. लोकांनी आत्ता मतामध्ये वाढ करून राष्ट्रवादीला भरघोस मतांनी निवडून द्या असे आहवान शेवटी त्यांनी केले.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले. मी या पाटण विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करताना बोलण्यापेक्षा विकासाला प्राधान्य दिले. विविध प्रकल्प आणले. सर्व सामान्य माणसाच्या गरजांची पूर्ताता केली. लोकांना व्यवसाय मिळाला पाहिजे. या साठी आपण सतत धडपडत राहीलो पण विरोधकानी हे प्रकल्प बंद कसे पडतील हे पाहिले. अशा प्रवृत्तीच्या लोकांना घरी बसवा व सत्यजितसिंह यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यानी शेवटी बोलताना केले.

सभेला पाटण नगर पंचायतीचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुषमा महाजन, दिलीपराव मोटे, चंद्रकांत मोरे, महिला आघाडीच्या स्नेहल जाधव, युवती आघाडीच्या रोहिणी पाटील, वंदना सावंत, विश्वास निकम गणेश मोरे, मंगेश पाटणकर यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.