उदयनराजे भोसले, शंभूराजे देसाई यांच्या रोड शोला रेकॉर्ड ब्रेक गर्दी

तारळे : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ तारळे (ता.पाटण) येथे काढण्यात आलेल्या रोड शोला रेकॉर्डब्रेक गर्दी करत समर्थकांनी उदयनराजेंचा जयघोष केला. या रोड शो दरम्यान उदयनराजे भोसले आणि शंभूराजे देसाई यांनी मतदारांशी संवाद साधत झंझावात निर्माण केला.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शंभूराजे देसाई यांच्या प्रचारार्थ तारळे येथे सोमवारी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.छ.उदयनराजे भोसले, आ.शंभूराज देसाई, ना.नरेंद्र पाटील, अ‍ॅड.भरत पाटील, सागर राजेमहाडिक, डॉ.चंद्रशेखर घोरपडे, समृद्धी जाधव, महेंद्र जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नागठाणे येथून भव्य स्वागत झाल्यानंतर समर्थकांनी नागठाणे, सासपडे, कोंजवडे, अशी भव्य दुचाकी रॅली काढून उदयनराजे भोसले यांचे उत्साही स्वागत केले. उदयनराजे यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी गर्दी केली होती. उदयनराजेंचा ताफा तारळे येथे आल्यानंतर त्यांचे आ.शंभूराजे देसाई आणि ना.नरेंद्र पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तारळे येथे श्रीमंत राजेमहाडिक यांच्या राजवाड्याला उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. या रोड शोमध्ये राजाभाऊ जाधव, सोमनाथ खामकर, रामभाऊ लाहोटी, संजय देशमुख, अर्चना जरग, रामचंद्र देशमुख, सुनील काटकर, माणिक पवार, अभिजीत पाटील, विजय पवार यांच्यासह भाजप, शिवसेना, व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.