व्याजाच्या पैशांसाठी नांदल येथील कुटुंबाला शिवीगाळ व दमदाटी

फलटण: नांदल (ता.फलटण) येथील दौलत मच्छिंद्रनाथ कोळेकर यांनी व्याजाच्या पैशाबाबत तगादा लावून तक्रारदारास व त्यांच्या कुटूंबियांना शिवीगाळ व दमदाटी केली असल्याची फिर्याद फलटण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये संदीप दत्तू घाडगे रा.घाडगेमळा यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संदीप घाडगे हे पंचायत समिती येथे शिपाई पदावर काम करत असून घाडगे यांच्या फिर्यादीनुसार घाडगे यांनी सप्टेंबर 2017 मध्ये आईच्या औषधोपचारासाठी पंचायत समिती येथे कामास असणार्‍या दौलत कोळेकर यांना व्याजाने पैसे मागीतले त्यावर त्यांनी टक्के दराने 42 हजार रुपये दिले व घाडगे यांचेकडून यशवंत बँक , फलटण शाखेचे दोन कोरे चेक घेतले. त्यानंतर घाडगे यांनी कोळेकर यांना 44 हजार 800 रुपये दिनांक 9 / 11 / 2017 रोजी नोटरी करुन दिले.
रक्कम दिल्यानंतर घाडगे यांनी चेकची मागणी केली असता कोळेकर यांनी चेक नंतर देतो असे सांगून चेक दिले नाहीत. मच्छिंद्रनाथ कोळेकर यांचेकडून घेतलेली सर्व रक्कम व्याजासहित परत केलेली असताना जास्त रक्कमेच्या हव्यासापोटी पैशासाठी तगादा लावून खासगी सावकारकीचा परवाना नसताना टक्के व्याजाने पैसे दिल्याचे तक्रारदाराने फिर्यादित म्हणले आहे.दिनांक 15/3 /2019 रोजी सकाळी 9 वाजता दौलत कोळेकर यांनी घरासमोर येवून संदिप घाडगे व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन माझी व्याजाची रक्कम लवकरात लवकर द्या असे सांगून दमदाटी केली असल्याचेही तक्रारदार घाडगे आपल्या फिर्यादीत यांनी नमूद केले आहे .