Saturday, April 20, 2024
Homeठळक घडामोडीछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात; फलटण शहरात सर्वत्र भगवे वादळ

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात; फलटण शहरात सर्वत्र भगवे वादळ

फलटण: अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात जयभावानी जयशिवाजी च्या घोषणांनानी अवघा परिसर दणाणून सोडीत व सर्वत्र भगवे वादळ उठले होते या भगव्या वादळात न्हाऊन निघाला होता,तथापि सर्वत्र भगव्या पताकांचे जाळे अन गल्लोगल्ली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती स्थापणेसह छ. शिवाजी महाराज चौकातील सजवलेली मूर्ती आणि भव्य अशी सर्व तालुक्यातील शिवप्रेमी यांच्या एकजुटीने व फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांची पारंपरिक पध्दतीने काढलेली मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती या मुळे फलटण मध्ये अवघी शिवशाही अवतरली असल्याचा माहोल तयार झाला होता.
सर्व बहुजन समाजातील तरुणांनी एकत्र होत फलटण तालुका शिवजयंती उत्सव समिती स्थापन करून ढोल ताशांच्या गजरात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर (राजेसाहेब)यांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढली या मध्ये शहरासह ग्रामीण भागातील युवक,युवती व शिवप्रेमी सहभागी झाले होते या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे,उंट,घोडे,लेझीम,व इतर पारंपरिक वाद्य मुख्य आकर्षण ठरले या मध्ये हजारो शिवप्रेमी सहभागी झाले होते.
महाराष्ट्राचे अराध्य दैवत छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले, फलटण शहर व तालुक्यातील शिवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने या मिरवणूक मध्ये सहभागी होवून शोभा वाढवली या मध्ये शिस्तबद्ध व घालून दिलेल्या आचारसंहिता प्रमाणे सर्व समितीचे सदस्य व शिवप्रेमी सहभागी झाले होते तर ही भव्यदिव्य मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तर शिस्तबध्द नियोजन समितीच्यातीने करण्यात आले होते.
दरम्यान या शिवजयंती चे औचित्य साधून सोमवार दि. 6 मे रोजी सकाळी म. फुले चौक येथून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे नेतृत्व महिला व युवतींनी केले, त्यामध्ये शहर व तालुक्यातील तरुणी आपल्या मोटार सायकलसह सहभागी होवून रॅलीचा माध्यमातून अवघा राजा शिवछत्रपती यांच्या नावच्या घोषणाबाजी ने सर्व परिसर शिवमय करीत ही रॅली शिस्तबद्ध अशी सुंदर रॅली संपूर्ण शहरातील विविध भागात ही रॅली काढण्यात आली या मध्ये जीप वरती बालशिवाजी व आऊसाहेब जिजामाता यांच्या पुतळ्याचे भव्य आकर्षण होते.
सायंकाळी 6 वाजता श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब यांच्या अधिकार गृहासमोरील पुतळ्यापासून भव्य, दिव्य शोभायात्रेस सुरुवात झाली या वेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीला सुरुवात केली ही मिरवणूक पुढे येत महात्माफुले चौक-गजानन चौक – शंकर मार्केट- शुक्रवार पेठ- मलठण- पाचबत्ती चौक – बारामती चौक – छञपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरुन गेली या मध्ये अक्षरशः हजारोंच्या संख्येने सहभागी होत या मिरवणूकीचे जागोजागी स्वागत करण्यात आले, तीन ट्रॉली वर छ. शिवरायांच्या आकर्षक तीन मूर्ती बसविण्यात आल्या होत्या या मध्ये आकर्षक अशा मुर्त्या व देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या, संपूर्ण मिरवणूकीत आणि मिरवणूकीच्या शुभारंभ ठिकाणी भगवे झेंडे,भगव्या कमानी उभ्या केल्या होत्या, तर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या मिरवणूकीत 30 घोडे व 6 उंट आणि त्यावर शिवशाहीतील पोषाखासह घोडेस्वार व उंट स्वार बसले होते या मध्ये बालशिवाजी, युवक,युवती विविध पोशाख परिधान करून आले होते ते खरोखरच अवघी शिवशाही आली असल्याचे भासवत होते.
या मिरवणूकीत सातारा येथील 100 हुन अधिक महिला यांचे आकर्षक झांज पथक , फलटण येथील युवकांचे झांज पथक, सोलापूरचे लेझीम पथक, माळशिरसचे हलगी पथक, फलटणचे सुंबळ पथक आणि बारामतीचे दांडपट्टा पथक सहभागी झाले होते, यामुळे मिरवणूक अक्षरशः सर्वांना आवडली मिरवणूकी सर्वांचे आकर्षण ठरली सुरुवातीपासून शेवटपर्यंत लोक मिरवणूक पाहण्यासाठी थांबून राहिले होते. मिरवणूकीच्या आग्रभागी तुतारी पथक होते.
ही संपूर्ण मिरवणूक पाहिल्यानंतर प्रत्येकाला शिवकालाचा अनुभव निश्‍चितपणे आला तर फलटण ही छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडी असल्याने, त्यातून छ. शिवरायांनी स्वराज्य उभारणीसाठी केलेले प्रयत्न त्यांना तत्कालीन मावळे व सर्वसामान्यांनी केलेली साथ स्वराज्य स्थापना, छ. शिवरांयाचा राज्याभिषेक, शिवशाहीतील सामान्य माणसाच्या मनातील समाधानाची भावना प्रत्येकाच्या मनासमोरुन तरळुन गेली साहजिकच या मिरवणूकीत सहभागी झालेला प्रत्येक जण त्याचप्रमाणे मिरवणूक पाहण्यासाठी आलेला अबालवृध्द समाज निश्‍चितपणे शिवरायांच्या त्या पराक्रमापुढे, त्यांच्या राज्यकारभार पध्दतीपुढे, समाजाप्रती असलेल्या त्यांच्या भावना आणि समाजाचा त्यांच्याप्रती असलेला आदरभाव स्मरुन नतमस्तक झाल्याशिवाय राहिला नाही इतकी ही शोभायात्रा,तथा मिरवणूक भव्य, दिव्य आणि शिवकालाची महती व माहिती समजावून देणारी ठरली असा प्रत्यय सर्वांना आला.
फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीने गेल्या 2 वर्षांपासून हा उपक्रम सुरु केला आहे त्याचे हे एकच शिवजयंती साजरी करण्याचे हे ऐतिहासिक तिसरे वर्षे होते. शहरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळे आणि शिवप्रेमींना एकत्र करुन एकच भव्य दिव्य शिवजयंती साजरी केली जात असल्याने या उत्सव समितीचे सर्वांनी कौतुक केले, यावर्षी त्या दोन वर्षे प्रमाणे किंवा त्या पेक्षा ही अधिक उत्साहात भव्य शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular