दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यात कमी पडणार नाही खा.रणजितसिंह यांची आपुलकीने चौकशी केली; पंतप्रधानांनी दिले आश्‍वासन

फलटण: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघ राज्यासह देशात खूप गाजला. यामुळे सर्वच नूतन खासदार यांना हा मतदार संघ लक्षात राहिला. फक्त उत्कंठा होती की या मतदारसंघातुन निवडून आलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर कोण यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या दिल्ली येथील हॉटेल अशोका येथे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जवळ बोलावून माढा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती व त्या वरती उपाययोजना करण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही असा शब्द देत खा.रणजितसिंह यांची आपुलकीने चौकशी केली.
काल गुरुवारी दि.20 जून 2019 रोजी सायंकाळी 7.00 वा. हॉटेल अशोका येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोबत आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमाप्रसंगी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आवर्जून बोलावून घेऊन त्यांचे सोबत आपुलकीने चर्चा केली व विकासकामांबाबत कोणतीही चिंता करू नये दुष्काळी भागांचा कायम स्वरूपी दुष्काळ संपवण्याबाबत ठोस कार्य करू असे आश्वासन दिले.
यामुळे माढा मतदारसंघातील जनतेला नीरा देवधर चे पाणी देत पाणीदार खासदार अशी ओळख निर्माण केलेल्या खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सर्वच्या सर्व सहा तालुक्यातील शेतकर्‍यांना आशा निर्माण झाल्या असून त्या पूर्ण होतील असा शब्द खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
त्यातच या नूतन मोदी 2 सरकारने नुकतीच जलआयोग मंत्रालय स्थापन केले असून त्या मध्ये खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना काम करण्याची संधी मिळेल असे बोलले जात आहे.