गृह विभागाच्या उच्चाधिकार चौकशी समिती सदस्यपदी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण: केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या उच्चधिकार चौकशी समितीच्या सदस्यपदी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे निवड करण्यात आली.
या समितीचे माध्यमातून या अधिकार क्षेत्रात राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय सुरक्षितेच्या विषयासंबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा या समितीच्या माध्यमातून पुरवली जातात तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चौकशा तसेच केंद्र सरकारच्या अंतर्गत सर्व सुरक्षा एजन्सी या समितीच्या माध्यमातून कामे केली जातात या महत्त्वाच्या कमिटीवर निवड झाल्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रेल्वे व गृह या दोन्ही महत्त्वाच्या कमिट्यांवर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन होत आहे या निवडीबद्दल गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले.