नित्रळ परिसरात बिबट्याचा वावर कुत्र्यावर केला हल्ला

 

  1. वार्ताहर
    परळी

परळी खोरे हे अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते त्याच बरोबर संपूर्ण भाग हा वन संपदेने नटलेला,त्यामुळे वन्य प्राण्यांचाही वावर हा असतोच परंतु नागरी वस्तीत ही वावर वाढल्याने नागरिकांचा थरकाप उडत आहे.मौजे नित्रळ येथे रविवारी रात्री ३:३० च्या सुमारास सखाराम श्रीपती वांगडे यांच्या घराबाहेर साखळीने बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला केला.नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने धूम ठोकली परंतु वन्य प्राण्यांचा वाढता वावर जीवाला घोर लावणारा असल्याचे नित्रळकर ग्रामस्थांनी सांगितले.काहीच दिवसांपूर्वी उरमोडी जलाशया नजीक बिबट्याचे दर्शन झाले होते त्यामुळे संबंधित विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.