सातारा- जावलीतील 5 कामांसाठी 13 कोटी 90 लाख मंजूर

शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; विकासकामांचा झंजावात सुरुच ठेवण्याची ग्वाही
सातारा: आमदार ङ्गंडासह जिल्हा नियोजन समिती, राज्य आणि केंद्र शासनाकडे ठोस पाठपुरावा करुन विविध विकासकामांसाठी भरीव निधी मिळवण्याचे काम श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातत्याने सुरु ठेवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रस्ते व पूल परिक्षण व दुरुस्ती कार्यक्रम (2019-20) अंतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम या योजनेतून सातारा आणि जावली तालुक्यातील 5 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तब्बल 13 कोटी 90 लाख रुपये निधी मंजूर करुन घेतला आहे. विकासकामांचा झंजावात अशाच कायम सुरु राहील अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमीत्ताने मतदारसंघातील जनतेला दिली आहे.
सातारा आणि जावली तालुक्यांध्ये विकासकामांचा धडाका सुरु असून शिवेंद्रसिंहराजे यांच्या अभ्यासपुर्ण पाठपुराव्यामुळे प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीचा कायापालट झाला आहे. नागरिकांच्या ससम्या सोडवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शिवेंद्रसिंहराजेंनी निधी उपलब्ध करुन दिला असून सर्वप्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. राज्य शासनाच्या रस्ते व पूल परिक्षण व दुरुस्ती कार्यक्रम (2019-20) अंतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम या योजनेतून सातारा आणि जावलीतील 5 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करण्यात आला आहे. राज्य मार्ग 4 ते म्हसवे, करंजे, मोळाचा ओढा, शाहुपूरी, जुना मेढा रस्ता ते सारखळ रस्ता प्रजिमा 111 (0/00 ते 13/950 किमी) या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी 50 लाखाचा निधी शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाला आहे.
सातारा, गजवडी, ठोसेघर, चाळकेवाडी रस्ता प्रजिमा 29 (0/00 ते 24/00 किमी) या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 40 लाख, सातारा- कास बामणोली प्रजिमा 26 (28/00 ते 29/00) या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 45 लाख रुपये, जोर वाई- पाचवड ते मेढा प्रजिमा 19 (43/800 ते 45/300, 46/00 ते 46/400, 52/00 ते 53/00, 56/500 ते 58/00 आणि 59/750 ते 59/950) या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी 15 लाख रुपये तर, सातारा, कास बामणोली, तापोळा ते महाबळेश्‍वर प्रजिमा 26 (30/800 ते 36/00, 39/700 ते 44/800, 45/00 ते 45/900, 47/100 ते 51/700, 52/900 ते 53/00, 53/200 ते 3/500 आणि 54/200 ते 55/500 किमी) या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 4 कोटी 40 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
या सर्व कामांची निविदा प्रक्रीया व इतर शासकीय सोपस्कार पुर्ण करुन तातडीने कामे सुरु करा. सर्व कामे दर्जेदार करा, अशा सुचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागाच अधिकार्‍यांना केल्या आहे.