पक्षादेश मानून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवडूण आणणार: अमित कदम

सातारा: सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक होतो. तसा कार्यकर्त्यांचाही आग्रह होता. परंतु माजी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भारतीय जनता पार्टीमधील प्रवेशामुळे राजकीय समिकरणे बदलली असून मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची उमेदवारी जाहिर केली आहे. पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षादेश मानून मी भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेच काम करणार असून भाजपच्या उमेदवारांना निवडूण आणणार आहे, असा निश्‍चय जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमित कदम यांनी केला आहे.
यासंदर्भात अमित कदम यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा- जावली विधानसभा मतदारसंघात मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. जिल्हा परिषद निवडणूकीपासून मी सातारा- जावली मतदारसंघात भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. सातारा- जावली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि मी इच्छुकही होतो. माजी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय समिकरणे बदलली असून मी पुर्वी केलेल्या आवाहनानुसार पक्षाने सक्षम उमेदवार दिल्यास मी पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षादेश मानून काम करण्याचे धोरण घेतले आहे.
सातारा- जावली मतदारसंघाचे माजी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पक्षप्रवेश होवून मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांची उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे पक्षादेश मानुन पक्ष संघटनेबरोबर प्रामाणिक राहून काम करणार असून त्याबाबत लवकरच मेळावा घेवून निवडणूक प्रचारामध्ये सक्रीय राहणार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. येणार्‍या कालावधीमध्ये सातारा लोकसभा व सातारा- जावली विधानसभा तसेच वाई, महाबळेश्‍वर, खंडाळा विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार निवडूण आणण्याचा निश्‍चय केला असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येणार्‍या काळात पक्षाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सर्व कार्यकर्त्यांचा विभागवार मेळावा घेवून त्यांना निवडून आाण्याचा निश्‍चय केला असल्याचे कदम यांनी पत्रकात म्हटले आहे.