वासोटा पर्यटन बुधवारपासून पूर्ववत सुरू होणार आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार; जिल्हाधिकार्‍यांनी दिली परवानगी

सातारा: सातारा _ जावली तालुक्यातील कसबे बामणोली या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर बोट पर्यटन होत असून, वासोटा पर्यटन हे येथील पर्यटनाचा एक महत्वाचा केंद्रबिंदू मानला जातो.मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड कार्यालय अंतर्गत येणार्‍या बामणोली वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून वासोटा किल्ल्यावर जाण्याची परवानगी 16 ऑक्टोबर पासून बंद करण्यात आली होती.त्यामुळे वासोटा पर्यटन पूर्णपणे ठप्प झाले होते. याची माहिती सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेकडे बोट चालकांकडून देन्यात आली. काही दिवसांपूर्वी देखील बोट चालकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना भेटून होत असलेल्या नुकसानीबबत सांगितले. यावर स्वतः आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बामणोली येथील सर्व बोट चालकांना सोबत सकाळी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची भेट घेतली.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बोटचालकांच्या सर्व समस्या जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडून त्वरित बोटींगसाठी परवानगी देण्याची मागणी केली. तसेच पोलिस प्रशसनासही मी बोलतो असे त्यानी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी यानी लगेचच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांना दूरध्वनी करून जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याबाबत सूचना केल्या. दुपारी दोन वाजता डॉ. विनिता व्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर पुन्हा अडीच वाजता आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व सर्व बोट चालक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी डॉ. विनिता व्यास यांना तुम्ही फक्त वासोट्याला जाण्यासाठी पर्यटकांना तिकिटे द्या बाकी बोटिंगसाठी लागणार्‍या सर्व परवानग्या आम्ही लवकरच घेऊ,तसेच कोयना धरण व्यवस्थापन यांचे जे पत्र आपल्याकडे आले आहे.त्यासंदर्भात मी वरीष्ठ पातळीवरून पाठपुरावा करतो. मात्र तुम्ही वासोटा पर्यटन लवकरात लवकर सुरू कराअसे त्यानी सांगितले. यावर विनिता व्यास यांनी मला एक दिवसाचा वेळ द्या मी वरिष्ठांशी बोलून घेते. यावर शिवेंद्रसिंहराजे व सर्व बोट चालक जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. बाहेर पडताच लगेचच शिवेंद्रसिंहराजे यांनी सुनील लिमये अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक पश्चिम विभाग प्रमुख मुंबई यांना फोनवरून संबंधित प्रकाराविषयी माहिती दिली. यावर सकारात्मक उत्तर देत आपण दोन दिवसात वासोटा पर्यटन सुरू करू असे उत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळाल्याने येत्या दोन दिवसात वासोटा पर्यटन सुरू होत आहे. यामुळे बामणोली येथील सर्व बोट चालक आनंदीत झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे, राम पवार, बोट क्लब अध्यक्ष धनाजी संकपाळ, निलेश शिंदे, राजेंद्र संकपाळ, सदाभाऊ शिंदकर, संजय शिंदकर, विजय पवार, आनंद पवार, सुभाष पवार, संस्थेचे सर्व संचालक तसेच बोट चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.