Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गडीकर पुन्हा हजर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गडीकर पुन्हा हजर

पंचेचाळीस दिवसाच्या रजेनंतर स्वीकारला कार्यभार
सातारा: सातारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर शनिवारी पंचेचाळीस दिवसाच्या रजेनंतर पुन्हा हजर झाले. कामाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या उपस्थितीत वॉटर एटीएम सेंटरचे उदघाटन करण्यात आले.
दरम्यान गडीकर यांनी आपल्या प्रशासनाची बैठक घेऊन प्रलंबित कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयाचा लिपिक अमित राजे याने चाळीस हजाराची लाच मागितल्या प्रकरणी डॉ. गडीकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी झाली होती. प्रशासनातील अंर्तगत वादाचे वरिष्ठ पातळीवर पडसाद उमटल्याने डॉ गडीकर हे 21 सप्टेंबर2019 पासून रजेवर होते.
आरोग्य संचालक पुणे यांनी जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ संजोग कदम यांच्याकडे प्रभारी म्हणून नेमणूक करून जिल्हयाच्या आरोग्य सेवेची व्यवस्था केली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता डॉ आमोद गडीकर यांनी पुन्हा आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी गडीकर यांचे स्वागत केले. त्यांना शनिवारच्या दैनंदिन वॉर्ड शेडयुल्डची माहिती दिली . तब्बल पंचेचाळीस दिवसांनी हजर झाल्याने प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी गडीकर यांनी ताबडतोब प्रशासनाकडून माहिती घेत पुन्हा कामाला सुरवात केली .
दरम्यान गडीकर रुग्णालयात हजर झाले असता अतिदक्षता विभागाच्या दर्शनी भागात वॉटर एटीएम मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनचे उदघाटन नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या हस्ते करण्यात आले. गडीकर सुध्दा या छोटेखानी कार्यक्रमात सहभागी झाले. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना एक रुपयात शुद्ध पाणी मिळण्याची सोय झाली आहे. प्रशासकीय संकेताप्रमाणे गडीकर यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular