आमदार शंभूराज देसाई यांचा 53 वा वाढदिवस उत्साहात साजरा

सातारा: पाटण विधानसभा मतदारसंघात गाव तेथे सर्वांगीण विकास हि संकल्पना राबवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून कटीबध्द आहे. पाटण मतदार संघात गत पाच वर्षात 1806 कोटी रुपयांचा निधी विकासासाठी आणला असून या पुढील काळात लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या स्वप्नातील तालुका निर्माण करण्यासाठी अजुनही प्रलंबीत विकासकामांना निधी उपलब्ध करुन आणणार असल्याचा विश्वास व संकल्प आमदार शंभूराज देसाई यांनी आपल्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे. कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर ता. पाटण येथे सामाजीक विविध उपक्रमांनी आणि भरगच्च कार्यक्रमांनी आमदार शंभूराज देसाई यांचा 53 वा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर सकाळपासून रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक यांची मांदियाळी जमली होती.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख पाटण विधानसभा मतदार संघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा 53 वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी व मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण सौ. स्मितादेवी देसाई, सौ. अस्मितादेवी देसाई यांनी केले. यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे त्यांनी आशिर्वाद घेतले. त्यावेळी त्यांचे बंधू रविराज देसाई, चिरंजीव यशराज देसाई, कन्या कु. ईश्वरी देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेशाचे अभिषेक करुन तसेच मरळी गावची ग्रामदैवत श्री निनाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचेवतीने आमदार शंभूराज देसाई यांचा सत्कार व अभिष्टचिंतन करणेत आले. त्यानंतर त्यांनी कै. सौ. वत्सलादेवी देसाई,स्व. शिवाजीराव देसाई समाधी व पुर्णाकृती पुतळा,लोकनेते बाळासाहेब देसाई पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरेसाहेब यांचे 07 वे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे हस्ते तालुक्यातील गोर-गरीब महिलांना संसार उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात येऊन शिवदौलत सहकारी बँकेच्या दौलतनगर येथील शाखेच्या 16 व्या वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण समुहातील विद्यार्थी-विद्यार्थीनीं यांचेसमवेत फुगे सोडल्यानंतर त्यांचे हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच दुपारी 04.00 वाजता त्यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील तमाम जनतेच्यावतीने तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षणसमुहाच्यावतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात येऊन नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये प्रचंड मतांनी विजयी झालेबद्दल आयोजित केलेल्या हॅट्रीक आमदार महाविजयी सभेला त्यांनी मार्गदर्शन केले. सभेपुर्वी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध संस्था, मान्यवर यांचेवतीने त्यांची वहीतुला केली.
आमदार शंभूराज देसाई यांना शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. आमदार शंभूराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे,राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील दादा, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे,विधानपरिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर,खासदार श्रीमंती छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा जिल्हयाचे माजी पालकमंत्री विजय शिवतारे, माजी गृहराज्यमंत्री ना. दिपक केसरकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, आमदार सुनिल प्रभु, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खंडाळयाचे माजी सभापती नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील,कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजीत मोहिते,अविनाश मोहिते, जिल्हा परीषद सदस्य रमेश पाटील,प्रदीप पाटील,कराड जनता उद्योग समुहाचे राजेश पाटील, प्रकाश तवटे,जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता शरद राजभोज, तत्कालीन अधीक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता संजय सोनावणे, संजय उत्तुरे, परिक्षित थोरात, राजेंद्र देसाई, मुकुंदराव बर्गे,उदयसिंह पिसाळ-देशमुख, ङ इंद्रजित चव्हाण, भास्कर यादव, परेश शेठ, संजयराव पाटील पाली, विश्वजित राजूरकर,माजी आमदार सुनिल धांडेसर, लुईस शहा,राजेंद्र देसाई कोल्हापूर, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील, संचालक पांडूरंग नलवडे, आनंदराव चव्हाण, शशिकांत निकम, सोमनाथ खामकर,गजानन जाधव, वसंत कदम, संपत सत्रे, व्यंकट पाटील,अशोकराव डिगे, शंकर शेजवळ, राजेंद्र गुरव,विकास गिरी-गोसावी, विजयराव जंबुरे,अमोल पाटील, प्रकाशराव जाधव,प्रकाश पवार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, आशिष आचरे, सुग्रा खोंदु, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, संतोष गिरी, निर्मला देसाई, पंजाबराव देसाई, सीमा मोरे, सुभद्रा शिरवाडकर,पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक अब्दुलगणी चाफेरकर, नगरसेविका मनिषा जंगम,जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील, हरीष भोमकर, शैलेंद्र शेलार,सावळाराम लाड, धोंडीराम भोमकर, भागोजी शेळके, सदानंद साळूंखे, दिलीप सपकाळ, वाय. के. जाधव, गणेश भिसे,किसन गालवे,संजय देशमुख, उत्तम मोळावडे,प्रविण पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, जालंदर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डी.पी.जाधव,नथूराम कुंभार, बबनराव शिंदे,राजेंद्र चव्हाण,आर.बी.पवार,सुधीर पाटील,आनंदा काळे,अमोल चव्हाण, अभिजित चव्हाण,धनाजी केंडे,राजेंद्र पाटील, विष्णू पवार, अरविंद पवार, रामचंद्र पाटील पापर्डे, सुर्यकांत पानस्कर, विजय शिंदे आबदारवाडी सरपंच,नारायण कारंडे, नाना साबळे,संपत कोळेकर, यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका, जयमल्हार मातंग संघटना पाटण तालुका, कोयना परिसर साखर कामगार संघटना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच तालुक्यातील देसाई गटाचे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.