‘हेरिटेज वॉक’ला उपेक्षेची घरघर; सातार्‍याचा ऐतिहासिक वारसा अडचणीत

सातारा: जागतिक वारसा सप्ताहाला मंगळवारपासून सुरवात झाली आहे. वारसा स्थळाच्या संवर्धनाची जनजागृती ही सप्ताहाची मूळ संकल्पना असताना दुर्दैवाने या सप्ताहाची एकही चळवळ अथवा कार्यक्रम सातार्‍यात सुरू नाही . मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक शाहूनगरीतील अनेक शतकोत्तर वास्तू शेवटच्या घटका मोजत आहेत. मात्र ठोस उपाययोजनांच्या पातळीवर राजकीय इच्छाशकती मात्र शून्यं आहे.
सातारा शहरात पर्यटनाला कुठे जावे हे सांगताना अडखळल्यासारखे होतेच. शहराच्या मध्यवर्ती असणार्‍या ऐतिहासिक राजवाडयासह, कमानी हौद, सबर्बन कँटोन्मेंट, महादरे व मंगळवार तळे पंचपाळी हौद, चार भिंती या सारखी अनेक वास्तूंच्या उपेक्षेची घरघर हेरिटेज सप्ताहाच्या निमित्ताने ठळक झाली आहे. सातार्‍यातील जिज्ञासा मंचची सातार्‍याचा लुप्त ऐतिहासिक वारसा उजेडात आणण्याची एक धडपडं आहे.
हेरिटेज वॉकसारखे उपक्रम गेल्या दोन वर्षात त्यांनी राबवले. मात्र दुर्दैव म्हणजे सातारा पालिकेने यामध्ये कधीच पुढाकार घेतला नाही. सातारा शहराचा जुना इतिहास, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन अवशेष, व पुरातन पाऊलखुणांची ओळख करून देण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत मात्र या प्रयत्नांना बळ मिळताना खूप यातायातं करावी लागते मात्र सातारा पालिका या चाकोरीबाहय उपक्रमात सहभागी होत नाही. जिज्ञासा मंचने सातार्‍यातील ऐतिहासिक ठिकाणे व वास्तू पर्यटकांना दाखवून त्यांचे पुरातन संदर्भ सांगण्याचा स्त्युत्य प्रयत्न केला.
यंदाच्या हेरिटेज सप्ताहाची जनजागृती ही मूळ संकल्पना असताना ते तर सोडाच हेरिटेज वॉक काय तर संवर्धनाचंी जवाबदारीची जाणीवही सोडून देण्यात आली आहे. हेरिटेज वॉक हा उपक्रम व्यावसायिक तत्वावर चालवून शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक कृती कार्यक्रम आखला जात नाही ही अडचणं आहे.
हेरिटेज वॉकची स्थळे
राजवाडा, फाशीचा वड, चार भिंती, प्रतापसिंह हायस्कूल, मंगळवार तळे, मोती तळे, महादरे तलाव, पोलीस मुख्यालय इमारत, अदालतवाडा, पंचपाळी हौद, अजिंक्यतारा किल्ला, खापरी नळ योजना
हेरिटेज वॉकसारखा उपक्रम चालवण्यासाठी सातारा पालिकेने पुढाकार घेऊन पर्यटन वाढीसाठी पर्याय शोधावेत. त्याला आमचेही शक्य तितके सहकार्य राहिल. खासगी संस्था व पालिका यांच्या समन्वयाने हेरिटेज वॉक सारखे उपक्रम राबवण्याची गरज आहे.
निलेश पंडित-कार्याध्यक्ष जिज्ञासा मंच.