तासगाव येथील अवैध वाळू वाहतुक प्रकरणी गुन्हा दाखल

सातारा: तासगाव (ता.सातारा) येथे नदीपात्रातून पाऊणं ब्रास वाळू विनापरवाना घेऊन जाणार्‍या तिघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलं झाला आहे.
महसूल विभागाचे कर्मचारी संतोष शिवाजी झनकर यांनी फिर्याद दिली आहे. दि.18 रोजी तासगावातून नदीपात्राकडे जाणार्‍या रस्त्या लगत तीन अज्ञात इसमांनी ट्रॅक्टर ट्रॉलीतून साडेचार हजार रुपये किंमतीची पाऊण ब्रास चोरून नेली.
महसूल विभागाने पंचनामा करून त्याआधारे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार सावंत अधिक तपास करत आहेत.