वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून मारहाण

सातारा: वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून एकाला मारहाण झाल्याची घटना देगाव, ता. सातारा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास देगाव, ता. सातारा येथे वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून प्रथमेश नेताजी शिंदे ( वय 18) रा. देगाव सातारा याला सतीश साळुंके, प्रतिक साळुंके, सुशांत ननावरे, समाधान साळुंके, अभिजीत शिंदे आदींनी दगड व त्यांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन
दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याची घटना वाघोली, ता. कोरेगाव येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जीवन अशोक लाहिगुडे ( वय 21) रा. वाघोली, ता. कोरेगाव त्याने दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुचाकीच्या धडकेमध्ये एक जण जखमी
उंब्रज- चोरे मार्गावर कॉर्नरजवळ एकाला दुचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तो जखमी झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की यशवंत एकनाथ पवार ( वय 40) रा. नाव्हळवाडी, ता. कराड याला उंब्रज – चोरे मार्गावर गुरुवारी रात्री अज्ञात दुचाकी ने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तो जखमी झाला.
त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भांडणे सोडवण्यास गेल्याने मारहाण
भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाला मारहाण झाल्याची घटना लिंब येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दत्तात्रय सुभाषचंद्र सावंत (वय 22) रा. आवळी माथा, लिंब, ता. सातारा याला भांडणे होण्यास गेल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान तेथीलच आभिजीत घनश्याम सावंत (वय 19) याला किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली.
ट्रक – ट्रॅक्टर अपघातात एक जखमी
वरुड, ता. खटाव येथे ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अर्जुन दगडू खेडकर ( वय 40) रा. भालगाव, ता. पाथर्डी, जि. नगर हा पुसेसावळी येथून वडूजकडे ट्रक घेऊन जात असताना वरुड, ता. खटाव गावच्या हद्दीत ट्रॅक्टर बरोबर झालेल्या अपघातात तो जखमी झाला त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.