लोकमंगलच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

 

 

शाहूपुरी : लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या विविध शाळांनी दहावीच्या परीक्षेत उत्तुंग असे यश संपादित करून
शाळेस संस्थेच्या नावलौकिकात भर टाकली आहे.
लोकमंगल हायस्कूल नागेवाडी
कुशी या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयात मिळवला प्रसन्ना सावंत याने ८९.६० टक्के प्रथम क्रमांक , मयुरी सावंत ८८ टक्के द्वितीय क्रमांक ,लीना रघुनाथ सावंत ८७.२० टक्के गुण पटकावले.
लोकमंगल हायस्कूल एम. आय. डी. सी. सातारा या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.८० टक्के लागला. विद्यालयातील सायली बैलकर हिने ९०.८० टक्के प्रथम क्रमांक , ऋषिकेश पवार ९०.२० टक्के द्वितीय क्रमांक पटकावला. सुषमा भगत हिला ८९.४० टक्के तृतीय क्रमांक सई कुलकर्णी ८८.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात चतुर्थ क्रमांक पटकावला.
लोकमंगल हायस्कूल गेंडामाळ सातारा या विद्यालयाचा निकाल ६३.६३ टक्के लागला. विद्यालयात वरुण घाडगे याने ७१.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, देवांक संजय वांगडे याने ६०.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात दुसरा क्रमांक पटकावला. कोमल साळुखे हिला ५७ टक्के तिसरा क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्याचे लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, संचालिका शिल्पा चिटणीस, विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत भुजबळ, विद्या बाबर, नंदा निकम, सर्व शिक्षकांनी अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.