कन्या विद्यालय करंजे ची 100% निकालाची परंपरा कायम

 

 

वार्ताहर
परळी
सातारा..जिजाऊ शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय करंजे पेठ, सातारा ने मार्च 2020 चा इ.10वी चा निकाल 100%लावून 100% निकालाची उज्जवल परंपरा कायम ठेवून संस्थेच्या व विद्यालयाच्या नावलौकिक मध्ये भर घातली .यामध्ये कु. साक्षी शंकर कोरडे हिने 94.20%गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला . कु. देवयानी रमेश पार्टे हिने 90.60%गुण प्राप्त करून व्दितीय क्रमांक मिळविला. तर कु. अनुराधा संतोष शेडगे हिने 90.40%गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला . या विशेष यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचे व इतर सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे जिजाऊ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती. हिराबाई यादव, संस्थेचे सर्व पदाधिकारी ,शैक्षणिक, राजकिय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर ,शाळा व्यवस्थापन समिती,पालक,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.नंदिनी यादव,संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.