Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीराजवाडा बसस्थानकाच्या सुशोभिकरणासाठी 56 लाखाचा निधी मंजूर

राजवाडा बसस्थानकाच्या सुशोभिकरणासाठी 56 लाखाचा निधी मंजूर

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 56 लाख रुपयांचा निधी राजवाडा येथील सातारा शहर बसस्थानकाला मंजूर केला. या कामाचे भूमीपूजन शुभारंभ गुरूवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष विकम पावसकर व ज्येष्ठ नेते दीपक पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. नगरसेवक विजय काटवटे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये येणार्‍या राजवाडा बसस्थानकाच्या सुशोभिकरणासाठी निधी मिळणेकरिता पाठपुरावा केला होता. त्याचा कार्यादेश पालिकेने दिल्यानंतर प्रत्यक्ष नारळ फोडून या कामाला सुरवात करण्यात आली.
यावेळी भाजपचे गटनेते मिलिंद काकडे, धनंजय जांभळे, दत्ताजी थोरात, प्रशांत खामकर गोपाळ शेठ, किशोर गोडबोले, सागर पावशे, प्रशांत खामकर, हेमांगी जोशी सुवर्णा पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 56 लाखाच्या निधीमध्ये स्टँन्डला संरक्षण देणारी चाळीस फूट लांब व दहा फूट उंच संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून या भिंतीवर शिवकालीन तैलचित्र रेखाटण्यात येणार आहेत. याशिवाय हायमास्ट दिवे, बसस्थानकात क्राँक्रिट रोड, अद्ययावत सीसीटीव्ही सुविधा तसेच कंट्रोल रूमचे फर्निचर व स्पीकर सेट, दोन वॉटर टँक शासकीय योजनांची माहिती देणारा डिजिटल बोर्ड, एसटी वेळापत्रकांचा डिजिटल बोर्ड व रंगरंगोटी अशा सुविधा या योजनेत देण्यात येणार आहेत.
विजय काटवटे यांनी सतत दोन वर्ष पाठपुरावा करून थेट मुख्यमंत्र्यांकडून 56 लाखाचा निधी मंजूर करून आणला. विक्रम पावसकर यांनी नारळ फोडल्यानंतर काटवटे यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, सातारा शहराच्या पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. सातार्‍याच्या ग्रामीण भागातून येणार्‍या प्रवाशांना या सुविधांचा लाभ होणार आहे. भाजपने सातार्‍याच्या विकासाचा जो वेळावेळी शब्द दिला तो खरा करून दाखवला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular