Friday, April 26, 2024
Homeठळक घडामोडीदहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा

सातारा: दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाच्या निमित्ताने येथील महाराष्ट्र राज्य मार्केटींग गोदाम, एमआयडीसी येथे मतमोजणी प्रात्यक्षिक वेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी सर्वांना प्रतिज्ञा दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्यासह तहसिलदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत आणि मूल्ये धोक्यात आणणार्‍या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु, अशी शपथ यावेळी उपस्थित सर्वांनी घेतली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular