आबासाहेब लावंड यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड

वडूज: खातगुण (ता. खटाव) येथील सुपुत्र आबासाहेब श्रीकांत लावंड यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परिक्षेच्या माध्यमातून उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे.
ते माजी सरपंच श्रीकांत उर्फ बाळासाहेब लावंड यांचे चिरंजीव व जिल्हा बँकेच्या विसापूर शाखेचे शाखाप्रमुख मुकुंद लावंड यांचे बंधू आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण खातगुण येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण कोरेगांव च्या सरस्वती हायस्कुलमध्ये, उच्च माध्यमिक शिक्षण सातारा येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इस्लामपूर येथील राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी.ई., आय.एम.टी.सी. डिग्री प्राप्त केली.
शेवटच्या वर्षी झालेल्या कॅम्पस इंटरव्हूव मधून त्यांची भारत फौर्ज कंपनीत निवड झाली. त्या ठिकाणी एक वर्षे अनुभव घेतल्यानंतर त्यांनी सातारा येथील युनिक स्पर्धा परिक्षा अभ्यास सुरु केला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विक्रीकर निरीक्षकपद पटकावले. त्यानंतर ते उपशिक्षणाधिकारी व सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क या दोन परिक्षा पास झाले. यामध्ये त्यांनी उपशिक्षणाधिकारी पदास प्राधान्य दिले. दि. 1 ऑक्टोंबर पासून नागपूर येथे त्यांचे प्रशिक्षण होणार आहे. या निवडीबद्दल खातगुण परिसरत तसेच खटाव-कोरेगांव तालुक्यातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.