वडूज: अंबवडे परिसरातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या श्री भूतोबा देवाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी भंडार्याची उधळण करत भक्तांनी भूतोबाच्या नावाने चांगभल जा गजर केला. यात्रेनिमित्त सलग तीन दिवस अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
पहिल्या दिवशी देवाचा भंडारा, गजीनृत्य, ग्रामस्थांचे जेवण (महाप्रसाद), दुसर्या दिवशी गजीनृत्य व बेंगलोर येथील उद्योजक प्रकाशशेठ नलवडे यांच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले. गजीनृत्य महोत्सवात गारळेवाडी, धुळदेव, मासाळवाडी, डोंबारवाडी तसेच अंबवडे येथील दोन पथकांनी सहभाग घेवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. प्रत्येक संघास तीनवेळा खेळण्याची संधी मिळाली. गजीनृत्य खेळाडूंना तिसर्या दिवशी जेवण व मानपत्र देण्यात आले. या यात्रेस अंदाजे 3 लाखाची देणगी जमा झाली. या यात्रेत नवसाची मुले जोकण्यात येत असतात. हा नवस पाहण्यासाठी नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. यात्रेस गाव परिसरातील धनगर समाज तसेच इतर ग्रामस्थ व चाकरमाण्यांनी मोठ्या प्रमाणावर आवर्जुन हजेरी लावली होती. मेवा-मिठाई व खेळणे-पाळणे दुकाने मोठ्या संख्येने आली होती. ग्रामपंचायत व विश्वस्त मंडळाच्या वतीने यात्रेकरुंना सर्व प्रकारची सेवा पुरविण्यात आली होती.
अंबवडे येथे भूतोबा यात्रा उत्साहात
RELATED ARTICLES