Wednesday, April 17, 2024
Homeठळक घडामोडीचांगले काम करणाराच्या पाठीशी ईश्‍वरी शक्ती: नंदगिरी महाराज

चांगले काम करणाराच्या पाठीशी ईश्‍वरी शक्ती: नंदगिरी महाराज

वडूज: समाजाच्या भल्यासाठी चांगले काम करणार्‍या कार्यकत्यांच्या पाठीशी ईश्‍वरी शक्ती असते असे मत सोळशी ता. कोरेगांव येथील शनी देवस्थानचे मठाधिपती प.पू.नंदगिरी महाराज यांनी केले.
वडूज येथील येरळा परिवार, खटाव तालुका सोशल फौंडेशन, येरळा दौलत सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या भूमिपूत्रांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, धैर्यशिल कदम, सभापती कल्पना मोरे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप विधाते, प्रा. अर्जुनराव खाडे, माजी सभापती संदिप मांडवे, नंदकुमार मोरे, पं.स.सदस्य धनंजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनिल गोडसे, उपनगराध्यक्ष किशोरी पाटील, प्रा. बंडा गोडसे, अशोकराव गोडसे, नंदकुमार गोडसे, डॉ. विवेक देशमुख, दिलीप तुपे, सी. एम. पाटील, हणमंतराव देशमुख, वसंतराव गोसावी, विठ्ठलस्वामी महाराज, जयसिंगराव जाधव, मोहनराव बुधे, श्रीकांत देवकर, जगन्नाथ शिंदे, शशिकला देशमुख, शोभा माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नंदगिरी महाराज म्हणाले, समाजातील बहुतांशी लोक स्वत:चा प्रपंच करत असतात. मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक समाजाच्या प्रपंचासाठी वाहून घेतलेले असते. अश्या लोकांच्या विधायक उपक्रमांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मदत होत असते. गौरव कार्यक्रमामुळे खटाव तालुक्यातील विविध मान्यवरांच्या बौध्दीक, सामाजिक, प्रशासकीय, राजकीय क्षेत्रातील उंची समजली. कर्तबगार भूमिपूत्र ही तालुक्याची मोठी संपत्ती आहे.
श्री. मोहिते-पाटील भाषणात म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या भूमीपुत्रांचा गौरव करणे हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे नव्या पिढीस प्रेरणा मिळणार आहे.
कार्यक्रमात पिंपरी चिंचवड प्राधिकरण अध्यक्ष सदाभाऊ खाडे, कंपनी प्राधिकरणाचे न्यायाधिश मदन गोसावी, बांद्राचे उपजिल्हाधिकारी विश्‍वासराव गुजर, धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप, बेंगलोर बुलियन रिफायनरीचे अध्यक्ष विजयशेठ शितोळे, डी.वाय.एस.पी. मंदार गोडसे, उपशिक्षणाधिकारी आसावरी काळे, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, मंत्रालय सहाय्यक मनिषा खाडे, आर.टी.ओ. अमृत गोडसे, नाशिर मणेर, योगेश फडतरे, अभय साबळे, प्रिया कदम, राधिका इंगळे, साक्षी बनसोडे आदी भूमिपूत्रांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी प्रा. गोडसे, श्री. मांडवे, विठ्ठलस्वामी महाराज यांचीही भाषणे झाली. धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. अंकुशराव दबडे, लालासाहेब गोडसे, विजय शिंदे यांनी स्वागत केले. प्रसाद जगदाळे, शशिकांत देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. पी. डी. कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. आयाज मुल्ला यांनी आभार मानले.
कार्यक्रमास मजूर फेडरेशनचे संचालक सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्‍वर फडतरे, प्रदिप शेटे, जयवंत पाटील, प्रा. आनंदराव नांगरे, ईश्‍वरशेठ जाधव, विजय शिंदे लोणीकर, नवनाथ जाधव, आबासाहेब जाधव, टी. के. देवकर, हर्षवर्धन पंडित, शरद कदम, कल्याणी माने, प्रतापराव देशमुख, मोहनराव जगदाळे, सुभाषशेठ जगदाळे, डॉ. शंकर जाधव, डॉ. नारायण जाधव, मनोज कदम, निलेश सुतार, विष्णूशेठ जाधव, नितीन जाधव, विष्णू बनसोडे, प्रमिला पाटोळे, आशा बरकडे, शबाना मुल्ला, आयेशा मुल्ला आदिंसह शेकडो मान्यवर उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular