किकली गावात कृषिदूतांचे आगमन

भुईंज: सन 2019 ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय कराड येथील चतुर्थ वर्षात शिकत असलेले कृषिदुत भोसले मयुरराज, बोबडे संकेत, चव्हाण प्रसाद, चव्हाण सोहम, आवटे श्रीधर, घालमे शशिकांत हे किकली गावामध्ये हजर झाले.
या कृषिदूतांना शासकीय कृषिमहाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर.आर. सूर्यवंशी, केंद्राध्यक्ष डॉ.एम.एस. शिर्के, प्रा.कृषितंत्र विद्यालय बोरगाव,डॉ.डी.एस.नावडकर ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयीक सहयोगी प्राध्यापक शासकीय कृषिमहाविद्यालाय कराड, डॉ.पि.बी.पवार सहायक प्राध्यापक शासकीय कृषी महाविद्यालय कराड यांचे सहकार्य लाभेल.
किकली गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाअंतर्गत कृषिदूत गावातील शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञान नवनवीन संकल्पना, प्रात्यक्षिक माहिती देणार आहेत. यासाठी कृषिदूतांना गावातील सर्व ग्रामस्थ व शेतकरी यांचे सहकार्य लाभेल अशी ग्वाही सर्वानी दिली.
कृषिदुतांच्या स्वागत समारंभी गवाचे सरपंच धनंजय बाबर, उपसरपंच संदीप बाबर किकली, गावचे कृषि साहाय्यक विलास मोरे, तलाठी अडसुल मॅडम, प्रगतशील शेतकरीकिशोरकाका बाबर, श्यामराव बाबर, शिवाजी पाटिल, राजेंद्र बाबर व इतर शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले आणि आभार प्रदर्शन कृषिदुत संकेत बोबडे यांनी केले.