जलसंपदा मंत्र्यांना भेटण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

कवठे- केंजळ योजना व देगांव पाझर तलाव प्रश्‍नी धोम पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा
वाई : कवठे- केंजळ योजना पूर्ण होऊन देगांव पाझर तलाव व बंधारे भरून मिळावेत यासाठी देगांव( ता. वाई) येथील पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष युवराज जनार्दन गोळे यांनी आत्मदहणाचा इशारा दिला होता. देगांव ग्रामस्थ काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, सोमवारी ठरल्याप्रमाणे धोम पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काडून आत्मदहन करण्याचा इरादा स्पष्ठ असल्याचे दाखवून दिले.
कवठे-केंजळ योजनेचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करून मिळावे व देगांव येथील शेतकर्‍यांना जो भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तो दूर करावा अशा आशयचे निवेदन देवून येणार्‍या नऊ जुलै रोजी जलसंपदा मंत्री- गिरीश महाजन यांच्या समवेत बैठक घेवूनआमच्या मागण्या मांडण्याची संधी मिळावी, आमचे झालेले नुकसान भरपाई मिळावी, असे देगांव पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष- युवराज गोळे यांनी स्पष्ठ केले. व तूर्त उपोषण मागे घेण्यात आले.
दरम्यान सोमवारी सकाळी आकरा वाजता बावधन नाक्यावरून मोर्चाने देगांव ग्रामस्थ धोम पाटबंधारे कार्यलयावर आले. त्यावेळी उपकार्यकारी अभियंता-सुनील पोरे यांनी देगांव ग्रामस्थांच्या मागणीचा प्रस्ताव फॅक्सव्दारे जलसंपदा मंत्र्यांना कळविण्यात येवून त्यांचा कडून नऊ जुलै रोजी ग्रामस्थांच्या बरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळाल्याने देगांव ग्रामस्थांनी आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला. दरम्यान वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांनीही उपोषण कर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तहसीलदार यांनीही लेखी आश्वासन न दिल्याने देगांव ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते.
पाटबंधारे खात्याकडून उपोषण मागे घेण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. जनावरांचे देखील अतोनात हाल होत आहेत. देगांव येथील अस्तित्वात असलेल्या कवठे-केंजळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मिळावे या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून देगांव येथील पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष युवराज गोळे व त्यांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, प्रांत, तहसीलदार व वाई येथील धोम-बलकवडी कार्यालयाकडे वेळोवेळी पाणी मिळवण्यासाठी लढा देत आहेत.
मात्र शासन दरबारी त्यांच्या निवेदन व उपोषणांची कोठेही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसून त्यांनी सोमवार दि. 17 पासून वाई येथील धोम बलकवडी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.त्याला यश आले असून पाटबंधारे खात्याने जलसंपदा मंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे लेखी आश्वासन दिले.
कार्यकारी अभियंत्यांनी उपोषणाला सामोरे जावू लागू नये यासाठी त्यांनी रजेवर जाणेच पसंत केले,त्यामुळे या उपोषणाला प्रशासन न्याय देणार का.? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून देगांव ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा असणारागंभीर प्रश्न धोम-बलकवडीचे कार्यकारी अभियंता यांनी सोडवणे गरजेचे असताना देखील दीर्घ रजा काढून तो प्रश्न लोंबकळत ठेवला आहे. संबधित ठेकेदाराला या कामात दिरंघाई केल्याच्या कारणावरून दंड आकारण्यात आला आहे.
तरीही त्याच ठेकेदाराकडे आज मितीला काम देण्यात आले आहे, त्यामुळे कवठे-केंजळचे काम सध्या तरी अंधारातच आहे,अशीही चर्चा सध्या परिसरात चालू आहे. तरी त्वरित देगांव ग्रामस्थांच्या मागणीला न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.