नो हेल्मेट, नो पेट्रोल निर्णयाला स्थगिती

मुंबई  : अपघात रोखण्यासाठी नो हेल्मेट, नो पेट्रोल अशी सक्ती करण्याची घोषणा केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाला अखेर स्थगिती दिली. त्यामुळे  विना हेल्मेट पेट्रोल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  मंत्री दिवाकर रावते आणि पेट्रोल पंप असोशिएशनची बैठक आज पार पडली. त्यानंतर राज्य सरकार १ ऑगस्टपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. चर्चा करुन मार्ग काढण्याचे आदेश मंत्र्यांना देणार असल्याचे गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. परंतु, रावते यांच्या या निर्णयाला पेट्रोल पंप चालकांचा मोठा विरोध होता. त्यामुळे सरकारने तातडीने या निर्णयाला  स्थगिती दिली. दरम्यान, हेल्मेट सक्ती विरोधात १ ऑगस्टपासून पेट्रोल कंपन्यांकडून पेट्रोलच खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल-डिलर्स असोसिएशनने निर्णय घेतला होता. राज्यातील साडेचार हजार पेट्रोल पंप चालक यामध्ये सहभागी होणार होते. त्यामुळे घाईघाईने रावते यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे