जिल्हा बँकेमार्फत जेष्ठ नागरिकांचा सन्मान ; आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य

म्हासुर्णे (प्रतिनिधी  तुषार माने )- आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हासुर्णे ता.खटाव शाखेच्या मार्फत जेष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले.जिल्हा बँकेच्या म्हासुर्णे शाखेच्या मार्फत जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाखाधिकारी सुनिल भांग्यवंत साहेब म्हणाले जिल्हा बँकेने जेष्ठांसाठी त्यांच्या ठेवीवर एक टक्का जास्त व्याज दराची सवलत राज्यात सर्व प्रथम आपल्या बँकेने सुरू केली त्याचा लाभ जेष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भांग्यवंत साहेब यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक जेष्ठांचा नेहमीच आदरभाव व्यक्त करुन त्यांना प्रेरणा व आपुलकीची सेवा देत असते.जेष्ठ नागरिक हे समाजातील महत्त्वाचे घटक असुन सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले .
यावेळी चंद्रकांत शहा,बबन जंगम,गोरख पवार,शंकर डोळ,हरिदास तुपे,पांडुरंग सुतार,आत्माराम सरकाळे,रमजान तांबोळी,शांताराम कुलकर्णी ,दस्तगिर मुल्ला,माधव इनामदार ,यमगर,पाटील साहेब जेष्ठ नागरिक व खातेदार उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत शाखाप्रमुख सुनिल भांग्यवंत साहेब,कँशिअर पवार साहेब,बँकेचे कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.