संविधानाचा अपमान केल्याबाबत नागाचे कुमठे येथील एकास अटक ; सामाजिक सलोखा कायम               

 

सातारा : औंध औट पोलीस ठाण्यात नागाचे  कुमठे येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल स्टेट्स ठेवून संविधानाचा अपमान करण्यापूर्वी दिलगिरी व्यक्त करण्याची मानसिकता असताना ही अखेर त्याला एकट्यालाच पोलीस कारवाईला सामोरी जावे लागेल आहे.                                 याबाबत समजलेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील नागाचे कुमठे या गावातील सामाजिक सलोखा असताना त्याच गावातील मुंबई येथे नोकरी करीत असलेला युवक नरहरी श्यामराव साळुंखे(मांडवे) याने आपल्या मोबाईल स्टेट्स वर”’ संविधान काय घेऊन बसलाय६४ कला आणि १४ विधाचा अधिपती गणपती आहे. प्रथम पूज्य गणपती सपोर्ट प्रवीण तरडे.” अशा आशयाचा मजकूर ठेवला होता. सदरची बाब समजल्यानंतर नागाचे कुमठे येथील काही ग्रामस्थ, पोलीस पाटील यांनी समजावून सांगितले. रिपाइं कार्यकर्त्यांनी नरहरी साळुंखे याच्या घरी जाऊन हा स्टेट्स मोबाईल वरून काढून टाका. अशी सूचना केली होती.पण,  ”काय होत नाय, भिऊ नकोस.असा फुकटचा सल्ला काहींनी अनवधानाने दिला.त्याचा परिणाम म्हणून  नरहरीने मोबाईल स्टेट्स पोष्ट काढली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रिपाइं कार्यकर्त्यांनी त्याला संधी देऊन दिलगिरी व्यक्त कर असे बजावले. त्याच्या वडिलांनी ही दिलगिरी व्यक्त कर असे त्याला नम्रपणे सांगितले.                                                      ते सुध्दा ऐकले नाही म्हणून औध औट पोष्ट पोलीस ठाण्यात खटाव तालुका रिपाइं कार्यकर्ते गणेश भोसले, सुनिल मिसाळ, मृणाल गंडाकुश,मयूर बनसोडे, नंदकुमार रणदिवे, बिंटू पाटोळे, अंकुश पाडोळे,नाना जाधव यांच्या सह नागाचे कुमठे येथील रिपाइं कार्यकर्त्यांनी नरहरी साळुंखे(मांडवे) विरोधी राष्ट्रीय सन्मान (सुधारणा) अधिनियम २००३ नुसार कलम २ अनव्ये गुन्हा दाखल करण्यास दुसऱ्या दिवशी पोलिसांना भाग पाडले. आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी  जामिनीवर सोडण्यात आले आहे.                                             वादग्रस्त मोबाईल स्टेट्स काढून टाकून दिलगिरी व्यक्त करण्याच्या मनस्थिती असताना ही नरहरी साळुंखे  याने दिलगिरी व्यक्त करण्यास आला नाही. अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला व अटक व्हावे लागले अशी चर्चा सुरू झाली आहे.  या प्रकरणाचा तपास औध औट पोलीस ठाण्यातचे  तपास अधिकारी सुभाष डुबल हे तपास करीत आहेत.                                                खटाव तालुक्यातील रिपाइं कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन संविधान बचावचा नारा यशस्वी करून दाखविला. दरम्यान, याबाबत कोरोनाच्या पाश्वभूमीत विलगीकरण संपल्यानंतर खटाव -माण रिपाइं (आठवले गट) तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी नागाचे कुमठे येथे भेट देऊन जातीय सलोखा अबाधित राखण्याची विनंती केली तसेच या गोष्टींचा सर्वानीच बोध घेऊन सोशल मीडियावर  वादग्रस्त पोष्ट टाकू नये व व्हायरल करू नये  अशी विनंती केली आहे.याकडे दुर्लक्ष केल्यास गुन्हा दाखल होईल तसेच चुकीचा सल्ला देणाऱ्यांनाही  यापुढे पोलीस ठाण्यात सह आरोपी केले जातील असा गर्भित इशारा रिपाइं सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.दरम्यान, माजी सभापती संदिप मांडवे यांनी सांगितले की, सदरचा प्रकार दुर्दैवाने  गैरसमजुतीने घडला असून याबाबत सर्वानीच बोध घेतला पाहिजे.जातीय सलोखा कायम राखला जाईल.

(नागाचे कुमठे येथील कार्यकर्त्यांशी चर्चा करताना रिपाइं तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप)