पाटण तालुक्यात आस्वलांच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी 

ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील डोंगर पठारावरील दुर्गम समजल्या जाणार्‍या  मरड या गावातील गृहस्थ हणमंत दगडू मिसाळ वय अंदाजे  57 वर्षे हे शुक्रवारी रात्री 9 वाजता पाटणहून मरड या त्यांच्या गावी जंगलातून पायवाटेने जात असताना भिकाडी या गावाजवळ झुडूपात लपून बसलेल्या तीन रानटी अस्वलांनी त्यांच्यावर जोरदार  हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असुन अस्वलांनी  त्यांच्या एका  पायाचा लचका तोडला आहे.या हल्ल्याने श्री मिसाळ यांची परिस्थीती अतिशय गंभीर असून त्यांचेवर पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
या घटनेमुळे येथील डोंगरपठारावरील जनतेचे जीवन या रानटी हिंस्र पशुंपासुन धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील लोकांच्यात घबराट निर्माण झाली आहे.