खा. उदयनराजे भोसले व सागर भोसले यांच्याकडून पत्रकारांना ऑक्सिजन मशिन

सातारा:  खा.श्री.छ. उदयनराजे भोसले व उद्योजक सागर भोसले यांनी सातार्यातील कोरोना बाधित पत्रकारांसाठी दोन ऑक्सिजन मशिन्स् दिल्या. जलमंदिर येथे या मशिनचे वितरण करण्यात आले.
सातार्यात पत्रकारांसाठी निवांत  रिसॉर्ट येथे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी ऑक्सिजन मशिन्सची आवश्यकता होती. खा. उदयनराजे भोसले यांनी एकावेळी दोन व्यक्तींना उपयुक्त ठरेल अशी ऑक्सिजन मशिन सातारा जिल्हा पत्रकार संघाकडे सुपूर्त केली. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे राहुल तपासे, ओंकार कदम, तुषार तपासे, संतोष नलावडे, प्रमोद इंगळे, साई सावंत, बाळासाहेब गोसावी, पंकज चव्हाण, गोलू साळुंखे, बाळासाहेब ननावरे व पदाधिकारी  उपस्थित होते.
ऑक्सिजनची दुसरी मशीन उद्योजक सागर भोसले यांनी पत्रकार संघाकडे सुपूर्त केली. तिचा स्वीकार जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सुजित आंबेकर, चंद्रसेन जाधव व सहकार्यांनी केला.
सातारा जिल्हा पत्रकार संघाने दोघांचेही आभार मानले आणि या दोन्ही ऑक्सिजन मशिन्स, ऑक्सीमीटर, थर्मामीटर कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.