Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीओयो कंपनीच्या भ्रष्ट कारभारामुळे महाबळेश्‍वर येथील हॉटेल इंडस्ट्री बदनाम

ओयो कंपनीच्या भ्रष्ट कारभारामुळे महाबळेश्‍वर येथील हॉटेल इंडस्ट्री बदनाम

महाबळेश्‍वरः हॉटेल मध्ये रूमचे ऑनलाईन आरक्षणाची सुविधा पुरविणारे ओयो या कंपनी कडुन पर्यटकांची व हॉटेल मालकांची मोठया प्रमाणावर फसवणुक करण्यात येत असल्याने पर्यटक व हॉटेल मालक त्रस्त झाले आहेत. ऐन हंगामात ओयो कंपनीच्या या भ्रष्ट कारभारामुळे महाबळेश्‍वर येथील हॉटेल इंडस्ट्री बदनाम होत असुन याचा येथील हॉटेल व्यवसायावर विपरीत परीणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
हॉटेल मध्ये ऑनलाईन रूम बुकिंगची सुविधा पुरविणारे विविध कंपन्यांचे मोबाईल अ‍ॅप असुन या सर्व कंपन्यांमध्ये दराची तीव्र स्पर्धा आहे. सर्वात स्वस्त रूम देण्याची जाहीरात करून ओयो कंपनी अनेकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. कमी दराला बळी पडलेल्या अनेक पर्यटकांची फसवणुक झाल्याचे प्रकार येथे उघडकिस आले असुन त्या पैकी काही पर्यटकांनी तर थेट पोलिसात तक्रार नोंद केली आहे. सध्या महाबळेश्‍वर येथे उन्हाळी हंगाम सुरू असुन येथे रोज मोठया प्रमाणावर पर्यटक सहलीसाठी येत आहेत. अशा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करून अगदी सकाळच्या नाश्त्यासह चारशे रूपयात एसी रूम देण्याचे आमिश ही ओयो कंपनी दाखवित आहे. अनेक पर्यटक ओयो अ‍ॅप वरून आपल्या घरी बसुन चारशे ते पाचशे रूपयात रूम बुक करीत आहेत. बुिंकंग प्रमाणे ते जेव्हा येथील आरक्षण केलेल्या हॉटेल मध्ये पोहचतात तेव्हा तेथे त्यांना इतक्या कमी दरात रूम देण्यास अनेक हॉटेल चालक तयार होत नाही. कारण त्यांना इतक्या कमी दरात रूम देणे परवडत नाही. हॉटेल व्यवसायिकांना जर परवडत नाही तर मग ही कंपनी इतक्या कमी दरात आरक्षण घेतेच कशी हा प्रश्‍न येथे फसवणुक झालेल्या पर्यटकांना पडला आहे. चारशे ते पाचशे रूपयात रूम बुकिंग करूनही रूम मिळत नसल्याने त्यांना येथे हजार ते बाराशे रूपये खर्च करावे लागत आहेत. काही ठिकाणी जर पर्यटकांना आरक्षणा प्रमाणे रूम दिला तर त्या हॉटेल व्यवसायिकांना ओयो कंपनी वेळेवर रक्कम देत नाही. त्या मुळे अनेक हॉटेल व्यवसायिकांचीही ओयो कंपनी कडुन फसवणुक केली जात आहे.
आपल्याचकडे हॉटेलचे आरक्षण पर्यटकांनी करावे या साठी ओयो कंपनी हॉटेल शहरा पासुन कितीही लांब असले तरी त्याचा पत्ता महाबळेश्‍वर मध्येच दाखविते. प्रत्यक्षात हॉटेल महाबळेश्‍वर पासुन वीस ते पंचवीस किमी लांब देखिल असते. पांचगणी परीसरातील हॉटेल देखिल महाबळेश्‍वरच्या पत्त्यावर दाखवुन त्या हॉटेलचे आरक्षण ही कंपनी करते.
पांचगणी प्रमाणे वाई पांचगणीच्या जवळपास असलेल्या खेडयातील हॉटेलचे आरक्षणही ओयो कंपनी महाबळेश्‍वरचा पत्ता देवुन पर्यटकांचे आरक्षण करण्यात येते महाबळेश्‍वर येथे आल्या नंतर अनेक पर्यटकांना जेव्हा पुन्हा पांचगणीला जाण्याची वेळ येते. तेव्हा पर्यटक आपल्या डोक्यावर हात मारत बसतात जर हॉटेल पांचगणीच्या जवळ असेल तर त्यांनी पत्ता देखिल पांचगणीचा दिला पाहीजे. महाबळेश्‍वरचा पत्ता देवुन पर्यटकांची कंपनीने फसवणुक करून देवु नये अशी मागणी आता पर्यटकां कडुन केली जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular