Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीसातारा पालकमंत्र्यांबाबत शिवसैनिकांची खदखद राष्ट्रवादी नगरसेवकाने मांडली

सातारा पालकमंत्र्यांबाबत शिवसैनिकांची खदखद राष्ट्रवादी नगरसेवकाने मांडली

सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्रात भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सातारा जिल्हा पालकमंत्री म्हणून ना विजय शिवतारे या पुरंदरचे शिवसेना आमदारांची निवड करण्यात आली. पण, निष्ठावंत शिवसैनिकांना त्यांनी कधीच जवळ घेतले नाही.हाच धागा पकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातारचे राष्ट्रवादी व नगर विकास आघाडीचे नगर सेवक बाळासाहेब खंदारे यांनी सातारा जिल्हा कडे लक्ष दया असे जाहीरपणे सांगून एक प्रकारे शिवसैनिकांच्या मनातील खदखद मांडली असल्याची चर्चा सुरू झाली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे साठ वर्षापूर्वी काही काळ सातारा शहरात वास्तव्य होते. त्यावेळी शिवसेना स्थापन झाली नव्हती. पण, जेव्हा शिवसेना उभी राहिली त्यानंतर सातारा जिल्ह्यातील सुपुत्रांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. माजी आ. दगडू सपकाळ, खा. आनंदराव अडसूळ, मंत्री एकनाथ शिंदे, विजय चौगुले यांच्यासह कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर मंगल शिंदे,अनेक नगरसेवक-नगरसेविका,शिवसेना पदाधिकारी यांना संधी उपलब्ध करून दिली. त्याच सातारा जिल्हात सध्या शिवसेनेची अवस्था वाघनखे काढून टाकण्यात आलेल्या वाघासारखी झाली आहे. सातारा जिल्हाचे पालकमंत्री पदावर शिवसेनेचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांची निवड झाल्यानंतर काही काळ शिवसैनिकांचे निखारे फुलले. पण, त्यानंतर पालकमंत्री व निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. शिवसैनिकांना सत्तेत सहभागी नसल्याची खंत वाटते तर दुसर्‍या बाजूला आंदोलन करू शकत नाहीत.शिवसेनेचे उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदी नितीन बानूगडे-पाटील यांची निवड झाली आहे पण, त्यांना विकास कामांसाठी निधी खर्च करण्याचा अधिकार नसल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे सातार्‍यात शिवसैनिकांचा चांगलाच कोंडमारा सुरू झाला आहे. शिवसेनेसाठी आक्रमक भूमिका घेणारे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, हणमंतराव चवरे, दत्ताजी बर्गे,महेश शिंदे, अशोक भोसले,संजय मोहिते, एकनाथ संकपाळ, निमिष
शहा ,प्रताप जाधव यांच्या सारख्या अनेक शिवसैनिकांनी पालकमंत्री सातार्‍यात आले की त्यांची भेट घेण्याचे टाळले जाते असेच अनेकदा दिसून आले आहे. काल सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री विजय शिवतारे यांना चांगलेच कोंडीत पकडून प्रश्नांची सरबत्ती झाली. पण, त्यांचा बचाव करण्यासाठी शिवसेनेचे सदस्य पुढे आले नाहीत.भाजप सदस्यांनीही ,,,जो हो रहा है।वो अच्छा हो रहा है,,, असे समजून घेतले.त्यावर कहर म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व नगरसेवक आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब खंदारे यांनी मागासवर्गीय वस्ती व इतर सुचवलेली कामे होत नाहीत. पालकमंत्री फक्त शासकीय बैठक घेतली तर येतात. त्यांचे सातारा जिल्हा तील कामकाजावर लक्ष नाही. दुष्काळी भागाला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. अशा शब्दात नाराजी प्रकट केली होती. त्याचे चांगले पडसाद उमटले आहेत. एकप्रकारे काही नाराज शिवसैनिकांची खदखद मांडली गेली असल्याची जाणीव करून दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन सातार्‍यातील शिवसेनेची मरगळ दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सातारा-जावळी, फलटण, माण-खटाव, वाई, कराड(उत्तर) मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे.त्या ठिकाणी जाऊन शिवसेना नेते यांनी दौरे करावेत अशी इच्छा शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular