पालकांनी मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा व करियर निवडावे:डॉ.विनीता व्यास

सातारा : शालेय जीवनात अभ्यासाबारेबरच कला आणि क्रिडा ही महत्वाची आहे. आयुष्यातील चढ उतार झेलण्यासाठी कला क्रिडा अत्यंत उपयुक्त आहेत. पालकांनी मुलांना जे आवडते ते देण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्या मनात जें आहे ते आपल्या पाल्यांच्या मनात असेल असे नाही. पाल्याच्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्यासाठी त्यांच्या कला गुणांना वाव देवून सुप्त गुण विकसीत करावेत असे आवाहन कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका डॉ. विनीता व्यास यांनी केले.
सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दातार-शेंदूरे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात साजर्‍या झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. दोनसत्रात संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक विभागासाठीॅ प्रमुख पाहुणे म्हणून सातारा येथील बालकल्याण समितीचे सदस्य अ‍ॅड. योगेंद्र सातपुते हे होते. तर माध्यमिक विभागाच्या संमेलनासाठी डॉ. विनीता व्यास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी शाळेचे अध्यक्ष अनंतराव जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शबनम तरडे , कायाध्यक्षा सौ जयश्री कुलकर्णी , विद्याथिर्ं प्रतिनिधि नचिकेत देशमुख, विद्याथिंनी प्रतिनिधिी कु. यशोदा देवल यांची प्रमुख उपस्थिती होती. सरंस्वती पूजन आणि दिप प्रज्वलनानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शबनम तरडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी इयत्ता नववीने तयार केलेल्या बायो डाव्हरसिटी ऑफ सातारा या विषयावरील हस्तपुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या बाल कलाकारांनी विविध विषयांवर बहारदार नृत्याचे सादरीकरण केले. यात व्याघ्र संरक्षण, देशभक्ती , वॉटर कप यावरील नृत्ये अधिक बहारदार झाली. अ‍ॅड. योगेंद्र सातपुते यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीबद्दल व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कौतुक करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पारितोषिक वितरण समारंभात विविध शालेय मुलामुलंंीसोबतच सर्वोत्कृष्ठ वर्ग म्हणून इयत्ता पाचवीच्या वर्गाला तसेच गुणवंत शिक्षक म्हणून सौ जयश्री कुलकर्णीँ आणि गुणवंत सेवक म्हणुन सौ. शैला धायतडके यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका सकुंडे यांनी केले.