गोविंद पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाड याला जामीन मंजूर

कोल्हापूर : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.  समीर गायकवाड याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे समीरची आता जामिनावर सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गायकवाड याच्या जामीनामुळं या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. समीर गायकवाड याला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सप्टेंबर २०१५ साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून  त्याने अनेकदा जामिनासाठी अर्जही केला होता.