Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीआचारसंहिता शिथील होताच पाटणच्या आमदारांनी सुरु केला कामांचा आढावा

आचारसंहिता शिथील होताच पाटणच्या आमदारांनी सुरु केला कामांचा आढावा

सातारा : लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता असलेमुळे अनेक मुलभूत गरजा असणारी विविध विकासकामे मोठया प्रमाणात प्रलंबीत राहिली होती.यामध्ये महत्वाचे पाणी टंचाईच्या काळात करावयाच्या उपाययोजना प्रलंबीत राहिल्यामुळे डोंगरी व दुर्गम अशा पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील गांवाना पाणी टंचाई भासत होती.विकासकामांमध्ये कायम तत्पर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी लोकसभेची आचारसंहिता शिथील होताच प्राधान्याने मतदारसंघातील पाणी टंचाईचा तहसिल कार्यालय पाटण येथे आढावा घेवून पाणी टंचाईसंदर्भात आवश्यक असणार्‍या सर्व उपाययोजना तात्काळ कराव्यात अशा सक्त सुचना संबधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
आमदार शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय येथे पाटण तालुक्यात जाणवणार्‍या पाणी टंचाई संदर्भात आढावा व करावयाच्या उपाययोजना संदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रंसगी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,नायब तहसिलदार लोंढे,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता गायकवाड, उपअभियंता गरुड,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आरळेकर,पाणी पुरवठा विभागाचे सर्व शाखा अभियंता, विस्तार अधिकारी यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
प्रांरभी आमदार शंभूराज देसाईंनी माहे डिसेंबर मध्ये करण्यात आलेल्या पाणी टंचाई आराखडयातून किती कामे मंजुर झाली व लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे किती कामे मंजुर होणे प्रलंबीत राहिली आहेत याची सविस्तर माहिती पाणी पुरवठा अधिकारी यांचेकडून घेतली. यामध्ये पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील वाडयांना टंचाई काळात टँकरने पाणी पुरविण्याची संख्या आता पाच ते सहा एवढीच राहिली आहे परंतू डोंगरपठारावरील गावामध्ये तसेच वाडयावस्त्यांवर विंधन विहीरी काढून देण्याची तसेच नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करुन देण्याची मोठया प्रमाणात मागणी आहे.माहे जुन पर्यंतच पाणी टंचाई आराखडा आपण माहे डिसेंबरमध्येच तयार करुन दिला असून त्यातील बहूतांशी कामे मंजुरही झाली आहेत उर्वरीत पुरवणी आराखडयातील कामांना आचारसंहिता असल्याने मंजुरी मिळाली नाही.आचारसंहिता आता शिथील झाली असून पुरवणी आराखडयातील कामांना तात्काळ मंजुरी घेवून पाणी टंचाईच्या आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असून टंचाई आराखडयातील किती कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आले आहेत व किती प्रस्ताव सादर करणे बाकीचे आहेत त्याची माहिती गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा उपअभियंता यांनी तात्काळ दयावी. पाणी टंचाईच्या संदर्भात दोनच दिवसापुर्वी मी जिल्हाधिकारी, सातारा यांची भेट घेतली असून पाणी टंचाईचे प्रस्ताव सादर होताच त्यास मंजुरी देण्यात येईल असे त्यांनी मला स्पष्ट सांगितले आहे. पाणी टंचाईमुक्तीकरीता लागणारा निधी आणण्यास मी कुठेही कमी पडणार नाही परंतू पाणी टंचाईच्या बाबतीत संबंधित अधिकार्‍यांनी अजिबात हयगय करु नये अशा सूचनाही आमदार शंभूराज देसाई यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या.
दरम्यान आचारसंहितेपुर्वी 6 गांवामध्ये विंधन विहीरी काढण्याचे काम पुर्ण झाले आहे तर 9 कामांना मंजुरी देण्यात आली आहे 3 विंधन विहीरीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तात्पुरुती नळ पाणी पुरवठा योजना 1 काम पुर्ण, 1 मंजुर व दोन कामांचे प्रस्ताव सादर, नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीमध्ये 1 सुरु 3 प्रगतीपथावर व 19 कामांना मंजुरी मिळणे आवश्यक आहे तसेच विहीर खोलीकरण करणेमध्ये 4 कामांना मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचा गोषवारा आमदार शंभूराज देसाईंनी संबधित अधिकारी यांचेकडून घेवून येत्या दोनच दिवसात मंजुर करावयाची कामे घेवून जिल्हाधिकारी, सातारा यांची पुन्हा भेट घेवून या कामांना मंजुरी घेण्यात येईल असे आमदार देसाईंनी सांगून कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून कोयना धरणातील सध्याच्या पाणीसाठयासंदर्भात सविस्तर माहिती घेवून सध्या कोयना धरणात पाणीसाठा कमी आहे. नदीच्या दोन्ही बाजुच्या गांवाना पावसाळा येण्यापुर्वी शेतीकरीता दोन टप्प्यात पाणी देण्याची गरज आहे तर पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरु राहणेकरीता नदीमध्ये पाणी असणे गरजेचे आहे
.धरणातील पाणी बाहेर जाण्यापुर्वी आपल्या मतदारसंघातील वस्तूस्थिती शासनाकडे सादर करावी व पहिले प्राधान्य सातारा जिल्हयाला दयावे असेही त्यांनी यावेळी सांगून कोयना धरणातील सध्याची पाणी परिस्थिती पहाता कोयनेचे पाणी राज्याबाहेर देवू नये अशी मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचेकडे करणार असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले. तसेच महिंद धरणातील पाणी जानुगडेवाडी, मंद्रुळकोळेपर्यंत येत नाही सोडलेले पाणी या गांवापर्यंत येईल अशीही तरतूद करावी अशा सुचना त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular