स्वा.सै.स्व. भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृतीदिनी होणार पाटण येथे पाचवे साहित्य संमेलन

पाटण: स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दोन आणि तीन फेब्रुवारीला पाटण मधे होणार दोन दिवसीय पाचवे साहित्य संमेलन या साहित्य संमेलनात स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, नितीन बानुगडे-पाटील, महाराष्ट्र – ऐकीकरण समितीचे अध्यक्ष व कर्नाटक सिमा वाद लढ्यातील सैनिक आ. दिगंबर पाटील, आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांची उपस्थिती राहणार असल्याचे साहित्य संमेलनाचे निमंत्रक सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी स्वातंत्र्य सैनिक स्व.भडकबाबा पाटणकर साहित्य संमेलन समितीच्या बैठकीत सांगितले.
येथील स्वातंत्र्य सैनिक भाई भडकबाबा नगर येथे दोन दिवसीय साहित्य संमेलनात शनिवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा. पाटण शहरातून भव्य ग्रंथ दिंडी व शोभा यात्रा होणार असून या मधे पाटण शहर व परिसरातील सर्व शाळांचा समावेश असणार आहे. तर सकाळी 11 वाजता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले, चित्रपट पटकथा लेखक प्रताप गंगावणे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुपारी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात कथाकथनकार सतीश कचरे यांचे कथाकथन, आणि प्रदिप कांबळे, प्रा. सौ. विजया म्हासुर्णेकर यांच्या सोबत पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील कवीचें कवी संमेलन होणार आहे. तर सांयकाळी स्थानिक कलाकारांचा मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वा. स्वातंत्र्य सैनिक भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृती दिना निमित्त शिक्षण महर्षि पाटण तालुक्याचे सुपूत्र कै. बापुजी सांळुखें यांना मरणोत्तर मानपत्र स्वामी शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांना देण्यात येणार आहे. यावेळी शिव व्याख्याते नितीन बानुगडे पाटील, महाराष्ट्र ऐकीकरण समितीचे अध्यक्ष आ. दिगंबर पाटील यांची व्याख्याने होणार असुन भाई भडकबाबा यांच्या कार्याचा आडावा अरुण खांडके मांडणार आहेत.
दुपारच्या सत्रात समारोप होणार असून माध्यम तज्ञ विश्वास मेेंहदळे, आ. शंभुराज देसाई, धारेश्वर मठाधिपती डाँ. निलकंठश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे भरगच्च स्टॉल लागणार असुन कोणताही ग्रंथ फक्त सत्तर रूपये एवढ्या कमी किमतीत उपलब्ध होणार आहे.