Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडी‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाटणचा संजय पाटील

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाटणचा संजय पाटील

पाटण: सध्या झी मराठी चैनलवर गाजत आसलेली तुझ्यात जीव रंगला. या मालिकेत नव्याने सामिल झालेली व लोकप्रिय होत चाललेली पांडबाची भूमिका चित्रपट क्षेत्राची आवड असलेले पाटण तालुक्यातील कुसरुंड येथिल संजय पाटील हे साकारत आहेत. संजय पाटील यांची या मालिकेत पांडबाच्या भूमिके बरोबर प्रवेश झाल्यापासुन तुझ्यात जीव रंगला या मालिकेची पाटण तालुक्यातील सर्वांना उत्सुकता लागुन राहीली आहे.
संजय हरिबा पाटील हे मुळचे कुसरुंड ता. पाटण येथील आहेत. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कुसरुंड येथे झाले तर महाविध्यालयीन शिक्षण पाटण येथे झाले. त्यांच्या घरात अथवा कुटूंबात चित्रपट क्षेत्राची व कला क्षेत्राची आवड नसताना त्यांना लहान पणापासुनच कला क्षेत्राची आवड निर्माण झाली. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्या नंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वी झाले. जोगवा, पांगीरा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ते झाला बोभाटा व येणारा नवा चित्रपट भिरकीट, या चित्रपटांच त्यांनी व्यवस्थापन केलय. तर
पिकुली, झाला बोभाटा, बळीराजाच राज्य येऊ दे, खेळ सातबाराचा, अग्निदिव्य व येणारे चित्रपट.. बेभान, भिरकीट या चित्रपटात त्याने प्रत्यक्ष काम केले आहे.
पाटण येथे पत्रकारांशी बोलताना संजय पाटील म्हणाले तुझ्यात जीव रंगला या मालिकेत पांडबा नावाची व्यक्तीरेका साखरतोय. निवडनुकीच्या काळात गाव लेवलला काय राजकारण व प्रकार घडतात त्याचा कसा फायदा राजकारणी ऊठवतात हे दृश्य चालू आहे. दोघा भावांचा जमिनीचा वाद त्यात पप्या दादा म्हणजे परेश पाटील काय गम्मत करतोय तर आंजलीबाई हा वाद कसा मिटवतात हे चित्रीकरण माझ्यावर चालू आहे. या मालिकेत काम करताना कलाकार म्हणून छान वाटतय. असे संजय पाटील यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular