पाटण मतदारसंघात पुन्हा “शंभुराज” ; १३,८४४ मतांनी शंभुराज देसाई विजय.

पाटण:- पाटण विधानसभा निवडणुकीत आज सातारा येथे झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे आ. शंभुराज देसाई यांचा पुन्हा विजय झाला. त्यांना एकुण १ लाख ०६ हजार ३३९ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव झाला असून त्यांना एकुण ९२ हजार ४९५ मते मिळाली. या एकुण मतादिक्यात आ. शंभुराज देसाई यांना १३ हजार ८४४ मतांचे मतादिक्य मिळाले. या निकालाने पाटण विधानसभा मतदार संघात पुन्हा “शंभुराज” आले आहे. या विजयाने देसाई गटात उत्साहाचे वातावरण असुन कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली.

सातारा येथे एम.आय.डी.सी. त सकाळी ८ वा. प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. सुरवातीला पोस्टल मतदान मोजण्यात आले. एकुण- ११३० या पोस्टल मतदानामधे आ. शंभुराज देसाई यांना- ३७४ तर सत्यजितसिंह पाटणकर यांना- ७५६ मते मिळाली. पोस्टल मतदान मोजनी नंतर प्रत्यक्ष EVM मशीन मधील मतदान मोजण्यास सुरुवात करण्यात आली. EVM मशीन मधील मतदान मोजण्याच्या एकुण ३१ फेऱ्या घेण्यात आल्या. यामध्ये शिवसेनेचे आ. शंभुराज देसाई यांना- १ लाख ०५ हजार ९६५ मते मिळाली अधिक पोस्टलची- ३७४ असे एकुण- १ लाख ०६ हजार ३३९ मते मिळाली. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना- ९१ हजार ७३९ मते मिळाली अधिक पोस्टल ची- ७५६ अशी एकुण- ९२ हजार ४९५ मते मिळाली. या एकुण झालेल्या मतदानात आ. शंभुराज देसाई हे- १३ हजार ८४४ मतांची आघाडी घेऊन निवडून आले. या विजयाने आ. शंभुराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी पाटण विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी विजयाचे बैनर लाऊन गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी केली.

विरोधकांचे मतादिक्य कमी करुण झालेला पराभव मान्य.- सत्यजितसिंह पाटणकर.

पाटण मतदार संघात कार्यकर्त्यांनी चांगल्याप्रकारे काम केले आहे. लोकांनीहि चांगला प्रतिसाद दिला आहे. मागच्या निवडणूकीपेक्षा आपल्या मतदानात वाढ झाली आहे. आणि विरोधकांचे मतादिक्य कमी केले आहे. हि लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची होती. यात धनशक्ती चा विजय झाला आहे. महाराष्ट्रातील निकाल पाहिला तर मंत्री- रथीमहारथी या निवडणुकीत मोठ्या मतादिक्याने पराभव झाले आहेत. यामुळे आपल्याला वाईट वाटुन घेण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांनी व मतदारांनी हा कौल मान्य करा. जो पराभव पचवतो तो नेहमी दोन पाऊले पुढे जातो. असे सांगून मतदार संघात शांतता ठेवण्याचे आहवान त्यांनी पाटण येथे जमलेल्या कार्यकर्त्यांना केले.

निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व पाटणकर गटाचे कार्यकर्ते पाटणकर यांच्या शिक्कामेन्शन या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात जमले होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले पराभवाला दोष देण्यापेक्षा आताच्या वेळेपासून पुढच्या निवडणुकीच्या कामाला लागा. कार्यकर्ते व मतदारांनी संयम ठेवून मतदार संघात शांतता ठेवा. कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन पुढचा विजय संपादन करण्यासाठी कामाला लागा. असे आहवान शेवटी त्यांनी केले.