पाटण – मरड बससेवा सुरू ; युवा सेनेच्या मागणीला यश.

पाटण.- पाटण तालुक्यातील दुर्गम व जंगली भाग ओळखल्या जाणाऱ्या मरड गावापर्यंत बस सेवा नसल्याने येथील ग्रामस्थ विद्यार्थी यांना पायी प्रवास करावा लागत होता. परिणामी अनेकांना जंगली श्वापदांचा सामना करावा लागतो.मध्यंतरी मरड येथील शेतकरी हणमंत मिसाळ यांच्यावर जंगली अस्वलाने हल्ला चढवला होता याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या युवासेना कार्यकर्त्यांनी पाटण आगारप्रमुखांना एस टी चालु करण्यासंबधी निवेदन दिले व पाठपूरावा केला. त्यास एसटी प्रशासनाने मंजूरी देत पाटण -मरड बस सेवा चालू केली. बस सेवा सुरू केल्याने मरड येथील ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा करून शिवसेना कार्यकर्ते व पाटण एस.टी.आगाराचे आभार मानले.

पाटण तालुक्यातील डोंगर- दुर्गम भागातील वनकुसवडे परिसरात मरड या ठिकाणी हणमंत मिसाळ या शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. हणमंत मिसाळ हे पाटण वरून बाजार करून भिकाडी मार्गे जंगलातील पायवाटेने घरी मरड या ठिकाणी चालले होते. यावेळी त्यांच्यावर जंगलातील अस्वलाने जिवघेणा हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. या गावाला थेट एस. टी. सेवा सुरू असती तर हणमंत मिसाळ हे अस्वलाच्या हल्यातुन बचावले असते. या मार्गावर काटीटेक, वनकुसवडे, मरड या गावांना जोडून रामेल, बामनेवाडी, जिमाणवाडी, जांभे, भिकाडी, मिसाळवाडी, धनगरवाडा, हि गावे आहेत. येथील शेतकरी नागरीकांना व त्यांच्या विद्यार्थी मुलांना दैनदिन व्यवहार साठी पाटण या ठिकाणी यावे लागते. या नागरीकांना पाटण ते वनकुसवडे, इथ पर्यंतच एस.टी.सेवा सुरू होती. येथून पुढे नागरीक व विद्यार्थ्यांना आपआपल्या गावी व घरी पायी चालत जावे लागत होते. हा डोंगर – दुर्गम, जंगली भाग असल्याने या भागात बिबट्या, अस्वले, गव्वा रेडे, डुक्कर आदी जंगली प्राण्यांचा वावर आहे. अशावेळी येथील नागरीकांना आपला जिव मुठीत घेउन पायी प्रवास करावा लागतो.
हणमंत मिसाळ यांच्यावर अस्वलाकडून झालेल्या हल्यामुळे येथील परिसरात भितीचे वातावरण आहे. या नागरीकांचा दैनदिन व्यवहार प्रवास सुरक्षित होण्यासाठी पाटण ते मरड व परिसरातील गावा पर्यंत थेट एस. टी. सेवा तात्काळ सुरू करावी. अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या सुचनेनुसार युवा सेना पाटण तालुक्याच्या वतिने तालुका अध्यक्ष ओंमकार भस्मे, शिवसेना पाटण शहर प्रमुख शंकरराव कुंभार, उप शहर प्रमुख महादेव खैरमोडे, नाना पवार, सुर्यकांत टोळे, अमर जगम, नानासो पवार, दादासो बर्गे,अमर जंगम, यांनी पाटण एस.टी.आगार प्रमुख निलेश उजळे यांना निवेदन देऊन मागनी केली होती. या मागनीला प्रशासकीय मान्यता देऊन पाटण-मरड एस.टी.बस सेवा सुरू करण्यात आली. पाटण- मरड एस.टी. सुरू झाल्याने मरड ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा करत शिवसेना कार्यकर्ते, आणि पाटण आगार प्रमुखांचे आभार मानले. यावेळ गणीभाई चाफेकर नगरसेवक पाटण, अशोकराव नायकवडी, ज्ञानदेव कदम, आनंदा बावधने, जगन्नाथ बावधने, रामचंद्र झोरे, भागोजी बावधने, कोंडीबा बावधने, पांडूरंग पवार, ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी चालक अल्ताफ आत्तार व वाहक सचिन सोनावले यांचा सत्कार करण्यात आला.