पाटण आगार एस.टी.च्या कारभारावर पंचायत समितीच्या सभेत ताशेरे

पाटण:- पाटण आगाराचा कारभार हा अत्यंत निंदाजनक असून लांब पल्ल्याच्या बसेस बंद केल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. हा सर्व खटाटोप खाजगी शिवशाही बस फायद्यात आनण्याचा असुन शिवशाही बस सर्व सामान्य प्रवाशांना परवडणारी नाही. पाटण तालुका पत्रकार संघाने उभारलेल्या लढ्यास आमचा पाठींबा असून त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही ही समिल होणार असल्याचे मत व्यक्त करुन पाटण आगाराचा चाललेल्या मनमानी कारभारा विरोधात पं. स. सदस्य बबनराव कांबळे यांनी चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी देखिल पाटण आगार प्रमुख उथळे यांना या प्रश्नावर धारेवर धरुन लांब पल्याच्या एस.टी.बस चालवायला आपणाकडे चालक-वाहक नसतिल तर ते आम्ही देतो. पण बंद केलेल्या लांब पल्याच्या गाड्या पुन्हा सुरु करा. असे खडसाऊन सांगितले. तुमच्या सोयीनुसार एस.टी.बस. सुरु ठेवत असाल तर सर्वसामान्य प्रवाशांनी करायचे काय असा संतापच पं. स. सदस्य प्रतापराव देसाई यांनी व्यक्त केला.

पाटण येथील पंचायत समितीच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात सभापती सौ. उज्वला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी उपसभापती राजाभाऊ शेलार, गट विकास अधिकारी संजीव गायकवाड सा गटविकास अधिकारी जयवंत वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम ज्ञात अज्ञात लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर जि प बांधकाम विभागामध्ये नव्याने रूजू झालेले अभियंते राजकुमार गणपत जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.
शिक्षण विभागाचा आढावा देताना गट शिक्षण अधिकारी आर. पी. निकम म्हणाले की, दिवाली सुट्टीनंतर आत्ता सोमवार दि २६ नोव्हेंबर पासून शाला सुरु होत आहेत. तसेच डिसेंबर महिन्यामध्ये विज्ञान प्रदर्शन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेणार आहे. यावेली एकवीस शिक्षकांना हा पपुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अचानक शाला भेटी सभापती व उपसभापती यांच्या सोबत सुरु असुन तीन शाळांना भेटी दिल्या आहेत आत्ता शाळा सुरु झाल्या कि पुन्हा अचानक शाळा भेटी सुरु होतील अशी माहिती यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचा आढावा देताना वावरे मँडम म्हणाल्या की, आहाराचे वाटप ८८ टक्के झाले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजने अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री चे अठरा प्रस्ताव पाठवले आहेत. तसेच हे वर्ष तृणधान्य वर्ष साजरे करायचे असल्याने तृणधान्यापासुन बनवलेली पदार्थ व त्याचे महत्व समजण्यासाठी विविध ठिकाणी प्रात्यक्षिके सुरु आहेत. आज पंचायत समिती पाटण येथे प्रात्यक्षिक केले आहे. त्याचबरोबर सन २०१७/१८ च्या सतरा अंगणवाड्या अजुनही प्रलंबित असूध अजुन त्या अंगणवाड्यांची कामे सुरु झालेली नाहीत. अंगणवाड्या़ची कामे प्रलंबित असल्याचे ऐकताच पं स उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी जि प बांधकाम च्या सर्व अभियंतांची कसूर चौकशी केली व त्वरित अंगणवाड्यांची कामे सुरु करण्याचे आदेश दिले.
यानंतर आरोग्य विभागाचा आढाला देताना डॉ. दीपक साळुंखे म्हणाले की, कुटुंबकल्याण कार्यक्रमातंर्गत ४८ टक्के काम झाले आहे. एकशे दोन लोकांना श्वान दंशाच्या लसी दिल्या आहेत. या महिन्यातील मुली जन्मदराचे संख्या १६१ व मुलं जन्मदर संख्या १७० इतकी आहे. त्याचबरोबर तालुक्यामध्ये डिलिव्हरीच्या वेली सिझरिंगचे प्रमान जास्त आहे. दहा ते पंधरा वयोगटातील मुलींचे हिमोग्लोबीन तपासणी केली असून ज्या मुलींचे हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे त्यांना योग्य तो सल्रा देऊन ओषधोउपचार करण्यात आला आहे. तसेच २७ नोव्हेंबर पासून गोवर व एम आर या लसी नऊ महिन्यापुढील बालके ते पंधरा वर्षापर्यंतची मुला मुलींना ही लस देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावेली ऊस तोड कामगारांची मुलं व झोपडपट्टी/ पालामध्ये राहणारी मुलं यांचे नियोजन कसे केले आहे त्यांना हे लसीकरण कसे करणार असा प्रश्न पं. स. सदस्य सुरेश पानस्कर यांनी केला. त्यावेळी या मुलांचे योग्य नियोजन केले असून कोणीही या लसीकरणापासून वंचित राहु नये यांची योग्य खबरदारी घेतली असल्याची माहिती डॉ. साळुंखे यांनी दिली.
विद्युत महामंडळाचा आढावा देताना मल्हारपेठ केद्रांच्या पानस्कर मँडम म्हणाल्या की, दीनदयाळू योजनेचे काम सध्या पूर्ण झाले आहे. त्याचवेळु पं. स. स. बबनराव कांबळे यांनी महावितरणावरील आपला राग ल्यक्त केला. ते म्हणाले की, महावितरणाला प्रश्न विचारुन काही उपयोग होत नाही त्यावरती कोणत्याही उपाययोजना केल्यख जात नाहीत.
एस.टी. परिवहन मंडळाचा आढावा देताना आगारप्रमुख उथळे आपल्या विभागाचा आढावा देताना सुरवातीलाच पं. स. स बबनराव कांबळे यांच्या म्हणण्याला उत्तर दिले. की सध्या तरी लांबपल्ल्याच्या व नविन बस सुरु करु शकत नाही. वाहक चालक कमी असल्याने व लांब पल्ल्याच्या गाड्यांना उत्पन्न कमी असल्याने त्या बसेस बंद केल्या आहेत. त्याचवेळी प्रवाशांच्या सेवेसाठी असणार्या परिवहन मंडळाने अशी कारणे देणे चुकिचे आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या बंद केल्याने सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. पत्रकारांनी जे आंदोलन उभारले आहे ते योग्यचं आहे आमचा त्यांना पाठिंबा आहे. शिवशाही सर्वसामान्य लोकांना ती परवडण्यासारखी नाही. त्यामुळे पत्रकार संघाच्या या लढ्यात आम्ही सहभागी होणार आहे असे मत प़ स स बबनराल कांबळे यांनी मांडले. त्याचवेळी प स उपसभापती राजाभाऊ यांनी ही परिवहन मंडळावरती ताशेरे ओढले तसेच पं स सदस्य प्रतापराव देसाई यांनी वडाप बंद आहे. आणि परिवहन मंडळाचा हा अद्यादुंद कारभार मग सर्व सामान्य लोकांनी करायचे तरी काय असा प्रश्न उपस्थित केला.
पं स ग्रामपंचायत विभागाचा आढावा देताना जयवंत वाघ म्हणाले की, अजुनही तालुक्यामध्ये एकशे चौसष्ट घरकुल अपुर्ण अवस्थेत आहेत. सन २०१८/१९ ची घरगुल मंजुर झाली आहेत परंतु अद्याप सन २०१६/१७ ची बरीच घरगुल अपुर्ण आहेत. विशेष करुन तारले भागातील खुद्द तारले गावातील घरगुल जास्त अपूर्ण आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
जि प बांधकाम विभागाचा आढावा देताना नव्याने नियुक्त झालेले अभियंता जाधव यांनी आपल्या विभागातील अपूर्ण अवस्थेतील कामं लवकरात लवकर पुर्ण होतील तसेच लोकांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असेल अशी ही ग्वाही यावेली त्यांनी दिली.
यांनंतर ग्रामिण पाणीपुरवठा विभागाचा देण्यात आला. त्यावेली प स उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी नाथाची पाग या गावातील पाणी प्रश्नावरती आक्रमक भूमिका घेतली व ते म्हणाले की, नाथाची पाग हे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या पाण्यावरती आज महाराष्ट्र आपली तहान भागवत आहे व वीज पुरवठा होत आहे. त्यांच्या पाण्या संबंधात कोर्टामध्ये काम सुरु आहे. जरी सीईओ नीं आदेश दिले काम सुरु करा म्हणून तरीही ते चूकिचे असून त्या प्रकल्पग्रस्तांवरती कोणीही अन्याय करु नये. खयी वस्तुस्थिती पाहाली नंतर निर्णय घ्याला तसेच पाणीपुरवठा विभागाने कोणताही दबाव त्या लोकांवरती टाकू नये असे राजाभाऊ शेलार यांनी सांगितले.
यावेळी पशुसंवर्धन, कृषी,जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभागांचा आढावा देण्यात आला. शेवटी आभार उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी मांडले.

 

जे अधिकारी सतत बैठकिला अनुउपस्थित राहतात त्या अधिकार्यांच्या वरिष्ठांना पत्र पाठवा व येत्या सोमवारी सगळे सदस्य त्या त्या अधिकारकयांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना विचारणा करु असे पं स उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी सांगितले.