30 हजार लोकांच्या उपस्थितीने पाटणकर गटाला मिळाली उर्जा

सातारा : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा नुकताच अमृतमहोत्सव वाढदिवस पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या पटांगणात सुमारे 30 हजार लोकांच्या साक्षीने व राष्ट्रवादीचे हेवीवेटनेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांना आमदार होण्यासाठी लोकांनी या निमित्ताने पोहचपावती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गतवेळच्या विधानसभेच्या निवडणुकीतील 18 हजाराचे लिड तोडण्याचा आत्मविश्‍वास पाटणकर गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे सन 2019 मधील पाटण विधनसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हातमिळवणी करुन लढविणार हे सिध्द झाले आहे.
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते विकासाचे भगिरथ सर्वसामान्याचे अधारस्थंभ लोकांच्या गळ्यातील ताईत म्हणून व देवमाणूस म्हणून ज्यांचा उल्लेख अवर्जुन नेतेमंडळी आपल्या भाषणातून करीत होते. ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके बाळ सरकार उर्फ दादा यांचा अमृतमहोत्सव सोहळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री भास्कर जाधव, विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळेस पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. शशिकांत शिंदे, सारंगबाबा पाटील, सातारा जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईन निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, उज्वला जाधव, राजाभाउ शेलार, जिल्हा नियोजन समिती सदस्य रमेश पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने या हेवीवेट नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमास स्वत:च्या खिशातील पैसे घालवून हजारो लोकांनी हजेरील लावल्याचा उल्लेख खुद्द दादांनी आपल्या भाषणात अवर्जुन केला आहे. तर प्रत्येक्षात विकास काय असतो हे प्रत्येक नेत्याने दादा म्हणजेच पाटणचा विकास असा उल्लेख केला. नेहरु उद्यान, रस्ते, पवनउर्जा प्रकल्प, तारळी, उतरमांड, मोरणा गुर्‍हेघर, महिंद सह छोटे मोठे प्रकल्प दादांनी मार्गी लावले.
दादा सार्वजनिक बांधकामंत्री असताना मुंबईतील नेत्रदिपक झुलता पुल हे विकासाचे रोल मॉडेल ठरले आहे. गेल्या साडेचार वर्षात पाटण तालुक्यात विकासाची नाळ खुटली आहे. अशी सूचना टीका टीपणी नेत्यांनी आपल्या भाषणात केली. विराट जनसमुदायामुळे भविष्यात तालुक्यात परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचे चित्र या निमित्ताने पहायला मिळाले. शांत, संयमी, निगर्वी असा पहिल्यापासून स्वभाग असलेल्या बाळ सरकार उर्फ दादा यांनी माझा अखेरचा श्‍वास असेपर्यंत लोकांची कामे करीत राहीन असा विश्‍वास व्यक्त केला.