महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सागर पाटील यांची वर्णी

ढेबेवाडी:महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदि सागर पाटील यांची निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष रामनाथ जहाड व कैलास पवार,यांच्या हस्ते सांगली,कोल्हापूर मिटिंग मध्ये आज एक मताने निवड करण्यात आली .
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामनाथ जहाड बोलताना म्हणाले की आज संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संघटना कार्यरत आहेत तरीही पत्रकाराचे अनेक प्रश्न व मागण्या आहेत व आज ही दररोज पत्रकारावर जीव घेणे हल्ले होत आहेत व पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबीयावर हल्ले होत आहेत व अन्य मागण्यांसाठी शासनदरबारी पत्रकाराचे असणारे पश्न , व मागण्या साठी महाराष्ट्र पत्रकार संघ आज काम करत आहे व पत्रकाराच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्र पत्रकार संघ नेहमीच कार्यरत राहणार आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी सागर पाटील बोलताना म्हणाले की वरिष्ठांनी जी माझ्यावर जबाबदारी सोपविली. आहे ती प्रमाणीकपणे काम करून गाव तेथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ स्थापन करून पत्रकाराचे असलेले प्रश्न व आडीआडचणी सोडविणेसाठी प्रयत्न करणार आहे असे म्हणले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष रामनाथ जहाड , महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र संघटक सचिन उपाध्ये , सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घुटुकडे , यांच्या सह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सांगली,कोल्हापूर पत्रकार व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.