फलटण नगरपरिषद पोट निवडणुक; शेवटच्या दिवशी चार अर्ज

फलटण: फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 अ च्या पोट निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार जनांचे सहा अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी दिली.
फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 अ मधील राष्टवादीचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होत आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार अर्ज दाखल आहेत अर्ज करण्याची अंतिम मुदत नऊ जानेवारी होती हा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे.
या प्रभागातून इच्छुकांची मोठी संख्या असल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता धूसर होती. राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत जगन्नाथ कुंभार यांच्या पत्नी रंजना कुंभार यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी 2 अर्ज दाखल केले आहेत.
राष्ट्रीय काँग्रेसने राजेश आनंदराव शिंदे यांना उमेदवारी दिली असून त्यांनी 2 अर्ज दाखल केले आहेत. भाजपाचे संदीपकुमार कैलाश जाधव, अपक्ष म्हणून प्रवीण काशीनाथ अडसुळ यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले असून दिवंगत जगन्नाथ कुंभार यांना श्रद्धांजलि म्हणुन निवडणुकीतून माघार घेत असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम यांनी स्पष्ट केले आहे. दाखल अर्जची उद्या दि 10 रोजी छाननी होणार आहे.