वाईतल्या घोटवडेकर हॉस्पिटलवर पोलिसांचा छापा

हॉस्पिटल, आयसीयु विभाग व मेडिकलची एकाचवेळी तपासणी
वाई : सातारा जिल्हयासह राज्याला हादरावणारा कु्ररकर्मा संतोष पोळ व त्याची 2003 पासूनची खून प्रकरणे गेली तेरा वर्षेे बिनबोभाटपणे चालू होती. याचा उलगडा बारा दिवसांपासून होऊ लागल्याने वाई तालुक्यात मोठी चर्चा चालू आहे. संतोष पोळ हा 2005 पासून घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये कामास होता. येथे कामास असताना त्याने विविध गुन्ह्यांचे कारनामे थंड डोक्याने केले. यासाठी त्याने नियोजनबध्दरित्या घोटवडेकर हॉस्पिटल व तेथील यंत्रणेचा वापर करून घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना पहिल्यापासून होता. तपासाचा भाग म्हणून घोटवडेकर हॉस्पिटलवर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक गुन्हे शाखा व वाई पोलिस यांनी संयुक्तरित्या मंगळवारी दुपारी 4 वाजता या हॉस्पिटलवर छापा मारला. अतिदक्षता विभाग व मेडिकलची सुमारे दोन तास कसून तपासणी केल्यानंतर महत्वपूर्ण धागेदोरे हाती आल्याचे पोलिस सूत्रानी सांगितले. पोळचे आणखी काही कारनामे यानिमित्ताने समोर येण्याची दाट शक्यता आहे.
chandrasen007
बोगस डॉक्टर संतोष पोळ हा डॉक्टरचा बुरखा पांघरून 2006 राजरोषपणे गुन्हे करत होता. घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये कामास लागण्यापुर्वीच त्याचे काळे कारनामे चालू होते. 2003 साली त्याने सुरेखा चिकणे हिचा धोममध्ये खून केला. तो गुन्हा पचल्याने त्याचा आत्मविश्‍वास वाढला व त्याने सराईतपणे वनिता गायकवाड यांचा 2006 साली निर्घुण खून केला. त्यानतंर त्याने विविध कालखंडात जगाबाई पोळ, नथमल भंडारी, सलमा शेख व अलीकडे 15 जून 2016 मध्ये मंगल जेधे यांचा खून केले. या सर्व प्रकरणात गुन्हा करण्याची पध्दत, वापरण्यात येणारी साधने, त्याची विल्हे वाटलावण्याची पध्दत हे सर्व एक सारखे होते. संतोष पोळने अतिशय धूर्तपणे घोटवडेकर हॉस्पिटलचा व हॉस्पिटलच्या पूर्ण यंत्रणेचा वापर करून घेतला. त्याने याच कालखंडात सुमारे 51 लाच लुचपत विभागाच्या मदतीने डॉक्टर, पोलिस तसेच शासनाच्या विविध खात्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनवर धाडी टाकून आपला दबदबा वाढविण्याचे काम केले होते. संतोष पोळने केलेल्या गुन्ह्यामध्ये त्याला लागणारी औषधे, इंजेक्शन, गुन्हयात वारंवार वापरण्यात येणारी अ‍ॅम्ब्युलंन्स हे कोठून उपलब्ध केले या संदर्भांत घोटवडेकर हॉस्पीटल हे पहिल्यापासूनच चर्चेत असल्यान संतोष पोळने केलेल्या खून सत्राचे केंद्रबिंदू ठरले असल्याने त्याची तपासणी करण्यासाठी आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वाई पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी मिळून पंधरा जणांच्या पथकाने मंगळवारी दुपारी चार वाजता धाड टाकली व रात्री उशीरापर्यंत हॉस्पीटल, आय.सी.यु. विभाग व मेडीकलची कसून तपासणी गोपनीय पध्दतीने केली. यावेळी मेडीकल मधून संशयास्पद औषधांचा साठा हस्तगत केला. हॉस्पीटल परिसरात बग्यांनी मोठी गर्दी झाली होती. एकाएकी पडलेल्या धाडीमुळे दवाखान्यात असलेले रूग्ण दहशतीखाली होतेे.
दरम्यान बोगस डॉ. संतोष पोळची साथीदार ज्योती मांढरे हिला ही वाई पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मंगळवारी दुपारी 2 वाजता तपास अधिकार्‍यांनी संतोष पोळ व ज्योती मांढरे यांना धोम येथील फार्म हाऊसवर नेहून तपासणी केली.
वैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशी व्हावी
काही वर्षापुर्वी डॉ. घोटवडेकर हॉस्पीटलमध्ये गर्भलिंग निदान मशीन अनियमीतता आढळल्याने सील करण्यात येणार होती. त्यावेळी जिल्ह ाआरोग्य अधिकार्‍यांनी पाठीशी घातल्याने व बोगस डॉक्टरांना अभय देणार्‍या संबंधीत अधिकार्‍यांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
रूग्णवाहिका वाई पोलिसांच्या ताब्यात
संताष पोळने विविध गुन्ह्यात वापरलेली व तपासाच्या दृश्टीने महत्वाची असणारी रूग्णवाहीका आठ दिवसापुर्वी मुंबई येथे पोलिस स्टेशनमध्ये जप्त करून ठेवण्यात आली होती. ती रूग्णवाहीका हस्तातंराची प्रक्रियापूर्ण करून वाई पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे.