महाबळेश्वर येथील आगीत जळालेल्या झोपडपट्टीवासियांना संसोरपयोगी साहित्याचे वाटप

????????????????????????????????????

महाबळेश्वर: माणसातली माणुसकी जिवंत रहावी व करुणा जागी रहावी या उदात्त हेतूने मुंबईतील शिक्षण महर्षि अजय कौल यांनी सातारा तालुक्यातील विविध शाळा व गरजवंतांना गेली 10 वर्षे प्रसिध्दी पासून दूर राहून सतत मदत करीत आहेत. अशीच मदत त्यांनी महाबळेश्वर येथिल भिषण आगीत जळालेल्या झोपडपट्टीवासियांच्या कुटूंबियांना त्यांचा संसार सावरण्यासाठी संसोरपयोगी साहित्याचे वाटप करुन केली.
महाबळेश्वर येथे पर्यटक येतो तो मौजमस्ती मजा करण्यासाठी. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा विसावा मिळवून मौजमजा करीत असताना स्वतःसाठी अमाप पैसा खर्च करताना नेहमीच स्वतःसाठी जगणारे येथे नेहमीच दिसतात. परंतू इतरांचे दुःख पाहून चटकण डोळ्यात अश्रू येणारा व त्यांच्यासाठी त्वरित सर्वोतोपरी मदत उपलब्ध करुन देण्यासाठी काहीपण करायची तयारी दाखविणारा हा अवलिया वेगळाच म्हणावा लागेल. केवळ माणुसकी हा एकमेव धर्म मानणारा व जपणारा आजपर्यंत पुस्तकातून वाचावयास मिळत असतो पण प्रत्यक्ष असा मणुष्य असण्याची साक्षात आठवण करुन देणारा हा ईसम कोणत्याही प्रसिध्दीचा हव्यास न बाळगता वंचितांना मदत करण्यासाठी नेहमी तत्परतेने मदत करण्यासाठी व त्यांचे दातृत्व स्विकारण्यासाठी तत्पर तैयार असतो. गेली 10 वर्षांहून जास्त वर्षे झाली परंतू आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ 29 डिसेंबर रोजी अनेक गरजवंतांची गरज भागविण्यासाठी स्वतः भेट देऊन मदत करण्याच्या ते प्रयत्नात असतात.
महाबळेश्वर येथिल झोपडपट्टीत लागलेल्या आगीत पाच कुटूंबियांच्या झोपड्या जळालेल्या समजताच. त्यांनी येथिल सामाजिक कार्यकर्ते व रोटरीचे क्लबचे माजी अध्यक्ष श्री. शिरिष गांधी व प्रा.श्री.गणेश कोरे यांना झोपडपट्टीवासियांना मदत करण्याची ईच्छा प्रदर्षित केली. याबाबत प्रत्यक्ष माहिती घेऊन रोटरी, ईनरव्हिल, पत्रकार संघ व विविध राजकीय पक्षातील पदाधिकार्‍यांना एकत्र करुन त्यांच्या हस्तेच त्यांनी झोपडपट्टीवासियांना संसारोपयोगी साहित्य, धान्य, गॅस शेगडी, चादर, ब्लँकेटसह विविध साहित्याची भरघोस मदत देऊन त्यांचा संसार उभा राहण्यासाठी मोठी मदत केली. याबरोबर दरवर्षी तालुक्यातील विविध शाळांना ते भरघोस मदत करत असताना पाचवड येथिल मूकबधीर विद्यार्थ्यांच्या शाळेला हॅाल बांधून आवश्यक त्या वस्तू दिल्या. खंडाळा येथिल मतिमंद शाळेला टि.व्ही, ब्लँकेट्स सह विविध वस्तू, सातारा जिल्ह्यातील अंधारी, मांडवे, वाडा कुंभरोशी बरोबर ईतर शाळेंच्या आवश्यक मागण्या त्यांना समजल्या की त्वरीत ते मदत देत असतात. याचबरोबर येथिल महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांसाठी पाण्यात जीव वाचविण्यासाठी व शोधकार्य करण्यासाठी हवेची मोटार बोटीसह जीव रक्षक साहित्याची मदत केली. याचबरोबर वाई येथिल आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी भरघोस मदत दिली आहे.
मुंबई येथिल वर्सोवा येथिल शाळेचे श्री. अजय कौल हे मुख्याध्यापक व ट्रस्टी असून त्यांचे उत्पन्न नेहमीच ते गरवंतांची गरज भागविण्यासाठी वापरत असतात. त्यांच्या सोबत ते नेहमी त्यांचे सहकारी व मित्र प्रशांत काशीद, सामाजिक कार्यकर्ते व रोटरीचे माजी अध्यक्ष रो. शिरिष गांधी, रो. गणेश कोरे यांची नेहमी मदत घेत असतात. कारण मदत देताना त्यांचा प्रामाणिक हेतू गरजवंतांना मदत करण्याचा असतो. पैसे किंवा वस्तू देण्यापेक्षा खर्‍या अर्थाने एखाद्या गरजूला त्याचा उपयोग व्हावा तसेच जास्त करुन शाळकरी विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी ते प्रयत्नशिल असतात. त्यांच्या या कार्याबाबत ते प्रसिध्दीपासून दूरच राहणे पसंत करतात. तसेच मदत देत असताना स्वतःच्या हस्ते देण्यापेक्षा ते अनेकांना एकत्र आणून इतरांच्या हस्ते मदतीचे वाटप करतात. त्यांच्या या कार्यासाठी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी देखिल आपले पक्ष बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी एका व्यासपिठावर येताना दिसतात. असा आगळा वेगळा माणूस आजच्या स्वार्थी जगात सापडणे हे विशेष कौतूकास्पद आहे.