प्राध्यापक शिंदे यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

सातारा : सातार्‍यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील प्राध्यापक एन व्ही शिंदे यांना मुंबई येथे नुकताच शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला . मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला . यावेळी एकनाथ बिरवटकर ,शंकर शिंदे व संपादक अभिजित राणे आदी मान्यवर उपस्थित होते
शिक्षणमहर्षी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीस वर्षे प्राध्यापक एन बी शिंदे हे ज्ञानदानाचे उत्तम पद्धतीने काम करत आहेत ग्रामीण भागात शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे आज अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ पदावर कार्यरत आहेत तसेच नवीन तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून ग्रामीण भागात संगणक ज्ञान घरोघरी पोहोचवण्याचे काम केले आहे . या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांना व प्राध्यापक साळूंखे यांना शिक्षणरत्न पुरस्काराने गौरविले .
या कार्यक्रमाला सौ शिंदे ,संजय शिंदे , सुशात शिंदे, लता शिंदे , साहित्यिक वैभव काळखैर ,पत्रकार अमोल खंडागळे आदी मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री बिरवटकर यांनी सांगितले की ज्येष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत असून समाजातील चांगले काम करणार्‍या व्यक्तीची दखल घेऊन संस्था त्यांचा गौरव समाजापुढे करते ही समाधानाची बाब आहे आज या सोहळ्यासाठी मान्यवरांनी उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्यामुळे सन्मान घेणार घेणार्‍या समाजातील मान्यवरांच्या पायात एक प्रकारे बळ आले आहे . सातारचे शंकर शिंदे यांच्या सहकार्यामुळेच ही संस्थेची वाटचाल सुरू आहे . शिक्षण , साहित्य क्षेत्रातील तसेच पत्रकार आणि आयुष्याभर समाज्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येथे अशी ही माहिती दिली. या पुरस्काराबद्दल प्रा शिंदे यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अभयकुमार साळुंखे व प्राचार्य शेजवळ, प्राचार्य अरुण गाडे, प्रा. विलास वहागावकर व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे